मुंबई,दि.१३: दाक्षिणात्य राज्यांमध्ये रसिक हे त्यांच्या लाडक्या सुपरस्टारच्या चित्रपटावेळी एका एका सणासारखं सेलिब्रेशन करतात. शहरात जागो जागी त्यांच्या लाडक्या स्टारची मोठ्या प्रतिमा उभारल्या जातात त्यावर दुधाने अभिषेकही घातला जातो, कित्येक ठिकाणी तर प्रेक्षक आपल्या लाडक्या स्टारसाठी रॅलीसुद्धा काढतात. तमिळ सुपरस्टार थलपती विजय त्याच्या आगामी ‘लिओ’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर लोकप्रिय अभिनेत्री त्रिशा कृष्णन दिसणार आहे.
अमेरिकेत या चित्रपटाने पहिल्याच…
या चित्रपटाच्या ट्रेलरला लोकांनी उदंड प्रतिसाद दिला, तसेच हा ट्रेलरही वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने या चित्रपटाची जबरदस्त चर्चा आहे. भारतात अजून याचं ॲडव्हान्स बुकिंग सुरू झालेलं नसलं तरी अमेरिकेत या चित्रपटाने पहिल्याच दिवसाचे ५.८ कोटी रुपये ॲडव्हान्स बुकिंगच्या माध्यमातून कमावले आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर एक वेगळाच इतिहास रचणार हे नक्की आहे. अशातच तामिळनाडू सरकारने ‘लिओ’साठी खास कायद्यामध्ये बदल केला आहे.
जानेवारी २०२३ मध्ये एका दुर्घटनेनंतर तामिळनाडू सरकारने चित्रपटाच्या सकाळच्या शोजवर बंदी आणली होती. आता खास थलपती विजयच्या ‘लिओ’साठी या कायद्यात बदल करण्यात आला असून निर्मात्यांच्या विनंतीनंतर सरकारने ‘लिओ’ चित्रपटाचे सकाळचे शोज आयोजित करायला परवानगी दिली आहे.
२०२३ मध्ये नेमकं के घडलं होतं?
११ जानेवारी २०२३ या दिवशी तमिळ चित्रपटसृष्टीचे दोन दिग्गज सुपरस्टार आमने सामने आले होते. या दिवशी थलपती विजयचा ‘वारीसु’ व अजितचा ‘थुनीगू’ हे दोन्ही चित्रपट प्रदर्शित झाले होते. अजितच्या चाहत्यांनी अक्षरशः ट्रकमध्ये भरून येऊन चित्रपटासाठी गर्दी गेली, त्याच्या चित्रपटाचा शो हा रात्री १ वाजता ठेवण्यात आला होता. चालत्या ट्रकच्या टपावर नाचणारी एक व्यक्ति ट्रकवरुन खाली कोसळली, त्या माणसाचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला. या घटनेनंतर तामिळनाडू सरकारने निर्मात्यांवर मध्यरात्री किंवा पहाटे चित्रपटाचे शोज लावण्यावर बंदी घातली होती.
आता खास थलपती विजयच्या ‘लिओ’साठी सरकारने हा नियम बदलला असल्याचं स्पष्ट झालं आहे. अद्याप निर्मात्यांना किती वाजता शो लावायची परवानगी मिळाली आहे याबद्दल खुलासा झालेला नाही, पण थलपती विजयच्या ‘लिओ’ला यामुळे चांगलाच फायदा होणार हे नक्की आहे. ‘लिओ’ १९ ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.