मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर केली खालच्या शब्दात टीका

0
मेहबूब शेख-चित्रा वाघ

मुंबई,दि.12: मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर टीका करणाऱ्या भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांना आता पवार गटाकडून उत्तर देण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mahebub Shaikh) यांनी चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली.

“लाचखोर नवऱ्याची सुपारीबाज बायको, चारित्र्याबद्दल बोलूच नको”, अशा शब्दात मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर टीका केली. चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंवर हल्ला करताना “मोठ्ठ्या ताई, तुम्हाला 100 कोटी वसुली करून देणारा गृहमंत्रीच आवडत असेल तर त्याला महाराष्ट्र तरी काय करणार? गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) त्यांना आवडणार नाहीच” असं म्हटलं होतं. त्याला मेहबूब शेख यांनी उत्तर दिलं.

काय म्हणाले मेहबूब शेख?

सध्या एक लाचखोर नवऱ्याची बायको जिला प्रसिद्धी हवी असते, ती गेल्या दोन दिवसापासून प्रसिद्धीसाठी सुप्रिया सुळेंवर टीका करत आहे. तिला बोललं की तिला महिला आणि बाईपण आठवतं. खरंतर तिचं तोंड उघडलं, भाषा ऐकली की महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला तिची भाषा माहिती आहे. तिची भाषा ही महिला आणि बाईपणाला शोभणारी आहे का, हिचं तोंड उघडलं की गटारगंगा तोंडातून बाहेर निघते. ती बाई संसदरत्न सुप्रिया सुळेंवर खालच्या शब्दात बोलते. पण सुप्रियाताई महिला नाहीत का? त्यांच्याबद्दल टीका करताना संस्कृत टीका करा. भाजपच्या इतर महिला नेत्या आहेत. उमाताई खापरेंसारख्या महिलांबद्दल आदर आहे कारण त्या पातळी सोडून टीका करत नाहीत, त्या सुसंकृत आहेत. पण ही लाचखोर नवऱ्याची सुपारीबाज बायको हिला सुसंकृतपणाचा अर्थ कळत नाही, म्हणून तिला तिच्याच भाषेत उत्तर द्यावं लागतं.

आज तू सुप्रियाताईच्या वांग्याचा हिशेब सांगतेस, एवढाच हिशेब जर माहिती होता, तर 2001 ते 2019 पर्यंत तू सुप्रियाताईंच्या शेतात वांगी तोडायला होतीस का? त्यावेळी हे आठवलं नाही का? 2001 ते 2019 पर्यंत सुप्रियाताईंच्या मागे फिरून तुझ्या चपला झिजल्या. आज त्यांच्यावर तू टीका करतेय, बरं टीका करताना शब्द कोणते वापरते? असं मेहबूब शेख म्हणाले.

सुप्रिया सुळेंनी आपला हिशेब निवडणूक आयोगाला दिला आहे. पण तुझ्या नवऱ्यावर लाचलुचपत विभागाने कारवाई केली तेव्हा उत्पन्ना स्त्रोतापेक्षा जास्त उत्पन्न आढळलं. त्यात दोन फ्लॅट ही बेनामी संपत्ती आहे. हे फ्लॅट कुठून आले? तू सुपाऱ्या घेऊन बदनामी करते त्याचे हे फ्लॅट आहेत का, अशी विचारणा मेहबूब शेख यांनी केली.

मुळात स्वत:चा नवरा लाचखोर, त्याला वाचवण्यासाठी भाजपमध्ये गेली. चारित्र्याबद्दल तुम्ही काही बोलूच नका. चारित्र्यावर तुझ्यासारख्यांनी बोलणं हा सर्वात मोठा ज्योक आहे. या लाचखोर नवऱ्याच्या बायकोने शिस्तीत बोललं तर शिस्तीत उत्तर देऊ, अन्यथा आम्हाला जे माहिती आहे ते सगळं बाहेर काढू, असं मेहबूब शेख म्हणाले.

काय आहे प्रकरण?

सुप्रिया सुळे आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद गेल्या काही दिवसांपासून वाढला आहे. अजितदादा (Ajit Pawar) राज्याचे मुख्यमंत्री झाल्यास त्याचा आनंदच असेल, त्यांना पहिला हार मी घालणार.पण दादा मुख्यमंत्री झाल्यावर त्याने राज्याच्या सुरक्षेसाठी देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्रिपद देऊ नये, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.

चित्रा वाघ यांचं उत्तर

राज्याच्या मोठ्ठ्या ताई…सुप्रियाताईंना ₹100 कोटी वसुली करून देणारा गृहमंत्रीच आवडत असेल तर त्याला महाराष्ट्र तरी काय करणार? गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारा गृहमंत्री तुम्हाला आवडणार नाहीच. महिलांच्या बेपत्ता प्रकरणात संपूर्ण देशातील आणि अगदी महाविकास आघाडी काळातील परिस्थिती सभागृहात सांगून तुमचे समाधान होणार नाही, असं चित्रा वाघ म्हणाल्या होत्या.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here