Lightning Strike: अचानक धावत्या कारसमोर पडली वीज, धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

0

मुंबई,दि.१६: Lightning Strike: अचानक धावत्या कारसमोर वीज पडली याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सध्या भारतात अनेक राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. अनेकवेळा वीज पडल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. पावसामुळे अनेक भाग जलमय झाले असून, पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात पूरासोबतच वीज पडण्याचाही सर्वात मोठा धोका असतो. दरवर्षी पावसाळ्यात वीज पडण्याच्या अनेक घटना घडतात, याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक भयावह व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

अचानक धावत्या कारसमोर पडली वीज | Lightning Strike

सोशल मीडियावर वीज पडल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ कारमधून घेण्यात आला आहे. यात कार रस्त्याने वेगाने धावताना दिसत आहे, यावेळी अचानक जमिनीवर वीज पडते आणि मोठा स्फोट होतो. हा स्फोट इतका जोरदार होता की, बॉम्बस्फोट झाल्याचा भास होतो. हा स्फोट किती जबरदस्त आहे, हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. एखादी व्यक्ती तिथे उभी असती, तर त्याचा नक्कीच कोळसा झाला असता. सुदैवाने या घटनेत कोणाला इजा झाली नाही.

विजांच्या कडकडाटांमुळे नागरिकांना मुसळधार पावसात घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला जातो. आतापर्यंत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यात वीज पडून लोकांचा मृत्यू झाला आहे. जीवाचा धोका टाळण्यासाठी हवामान खात्याने दिलेला ‘अलर्ट’ गांभीर्याने घ्या. भारतात मान्सून सुरू आहे, त्यामुळे अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. वीज पडण्याच्या घटना अनेक ठिकाणी घडू शकतात, त्यामुळे सावध राहा.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here