Nagesh Valyal: भाजपचे माजी नगरसेवक नागेश वल्याळ यांना BRS मध्ये येण्याची KCR यांची ऑफर

0

सोलापूर,दि.27: भाजपचे माजी नगरसेवक नागेश वल्याळ (Nagesh Valyal) यांना BRS मध्ये येण्याची KCR यांनी ऑफर दिली आहे. तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव (KCR) यांनी मंगळवारी भाजपचे माजी नगरसेवक नागेश वल्याळ यांना भारत राष्ट्र समितीमध्ये (BRS) येण्याची ऑफर दिली. KCR हे सोलापूर दौऱ्यावर आले आहेत.

KCR यांची नागेश वल्याळ यांच्या घरी सदिच्छा भेट

सोलापूर दौऱ्यावर असलेल्या केसीआर यांनी मंगळवारी पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यानंतर सरकोली येथे जाहीर सभेत भगीरथ भालके यांच्या बीआरएस प्रवेशाचा कार्यक्रम घेतला. यानंतर भोजन करून ते सोलापूरकडे रवाना झाले. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास भवानी पेठेतील भाजपचे माजी नगरसेवक नागेश वल्याळ यांच्या घरी त्यांनी सदिच्छा भेट दिली.

हेही वाचा KCR In Solapur: ‘होय, इथल्या नेत्यांचं दिवाळं निघेल आणि शेतकऱ्यांची दिवाळी होईल…’ के चंद्रशेखर राव

दरम्यान सोमवारी केसीआर यांचे भाचे तथा तेलंगाणाचे अर्थमंत्री टी. हरिश यांनी दोन मंत्र्यांसमवेत वल्याळ यांच्या घरी भेेट घेतली होती. वल्याळ यांनी बीआरएसमध्ये यावे असा त्यांनी आग्रह केला. यानंतर दुसर्‍या दिवशी मंगळवारी खुद्द केसीआर यांनी वल्याळ यांच्या घरी भेट देत त्यांना बीआरएसची ऑफर दिली.

यावेळी माजी खासदार धर्मण्णा सादूल, भाजपचे माजी नगरसेवक सुरेश पाटील, संतोष भोसले, श्रीनिवास रिकमल्‍ले, सुभाष शेजवाल हेदेखील तिथे हजर होते. या सर्वांसमवेत केसीआर यांनी बंद खोलीत सुमारे वीस मिनिटे चर्चा केली. या दरम्यान केसीआर यांनी वल्याळ यांना बीआरएसची ऑफर दिली. विविध पक्षांमध्ये नाराज असलेल्या नगरसेवक आदी घटकांना बीआरएसमध्ये आणण्याचे प्रयत्न आहेत. याच दृष्टीने केसीआर यांनी वल्याळ यांच्या घरी भेट दिल्याचे सांगितले जाते.

या भेटीत चर्चा करताना केसीआर यांनी वल्याळ यांना सुरेश पाटील, संतोष भोसले, श्रीनिवास रिकमल्‍ले, सुभाष शेजवाल या सर्वांना घेऊन हैदराबादला या, असे निमंत्रण दिले.

काय म्हणाले नागेश वल्याळ? | Nagesh Valyal

या भेटीने भाजपच्या गोटात विलक्षण अस्वस्थता पसरली आहे. या भेटीेबद्दल पत्रकाराशी बोलताना वल्याळ यांनी ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगत आपण भाजपमध्येच राहणार असे स्पष्ट केले तर सुरेश पाटील यांनी आपण या प्रभागाचे नगरसेवक असल्याने सोलापूरला पाहुणे म्हणून आलेल्या केसीआर यांचे स्वागत करण्यासाठी वल्याळ यांच्या घरी आले, असा खुलासा केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here