नागरिकांना होणार फायदा, आता रेशन दुकानात मिळणार ही सेवा

0

मुंबई,दि.२१: रेशन दुकानात महत्वाची सेवा देण्याचा सरकार विचार करत आहे. ग्रामीण भागात अनेक गावात बँक नसते. एटीएमची सुविधा नसते. पोस्टापाठोपाठ आता रेशनिंग दुकानांतही बँकांच्या सेवा उपलब्ध होणार आहेत. रेशनिंग दुकानांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सरकारने दुकानांना बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याची परवानगी दिली. जिथे बँका, एटीएमची व्यवस्था नाही, अशा ठिकाणी बँकिंग व्यवहारासाठी ग्रामस्थांना रेशनिंग दुकान आधार ठरणार आहे. रेशनिंग दुकानांचा उपयोग धान्य विक्रीबरोबर बँकिंगसाठीही करण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी दुकानदारांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

रेशन दुकानात मिळणार या सुविधा

राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका (अनुसूची -२), आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांच्या सेवा रेशन दुकानात उपलब्ध असतील. या निर्णयामुळे रोकड विरहित व्यवहार, देयक भरणा, आरटीजीएस, कर्जसुविधा आदी 
सुविधा ओटीपी आणि बायोमेट्रिक प्रणालीद्वारे उपलब्ध होणार आहेत.

असा होईल उपयोग

बँकांमार्फत विविध वित्तीय संस्थांच्या सहयोगाने ग्राहकास कर्ज सुविधा उपलब्ध होतील.

रोखविरहित व डिजिटायझेशनच्या माध्यमातून सर्व व्यवहार सुलभ, जलद व सुरक्षितपणे करता येतील.

रास्त भाव दुकानांच्या माध्यमातून विविध उत्पादन/सेवा पुरविल्यामुळे पुरवठा वाढेल तसेच क्रॉस-सेलिंगची शक्यताही वाढेल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here