e-KYC: किसान सन्मान निधी योजनेच्या ई-केवायसीसाठी नवीन सुविधा

0

सोलापूर,दि.7: e-KYC: केंद्र शासनाने अँड्रॉईड मोबाईलवर फेस ऑथेंटिकेशन (Face Authentication) ॲपद्वारे पी. एम. किसान योजनेच्या लाभार्थ्यांना ई केवायसी (e-KYC) प्रमाणिकरण करण्यासाठी नवीन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या सुविधेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना स्वतःचे तसेच इतर लाभार्थ्यांचे सुद्धा ई केवायसी प्रमाणिकरण करता येणार आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांनी दिली.

सदर App वापरण्याची कार्यपद्धती पुढीलप्रमाणे आहे | e-KYC

‘PMKISAN Gol’ या नावाचे App गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे. सदरचे App असून सर्वसाधारणपणे सर्व अँड्रॉइड मोबाईलसाठी वापरता येते. गुगल प्ले स्टोअर मधून मोबाईलवर PMkisan App Install करून घ्यावे. ज्या लाभार्थ्यांच्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये जुने PMkisan App असेल त्यांनी ते App Uninstall करून पुन्हा PMkisan App २.०.० हे ॲप्लिकेशन Install करावे. त्यानंतर येणाऱ्या स्क्रीनवर इंग्रजी व हिंदी या दोन भाषा निवडण्याचा पर्याय दिलेला आहे. त्यापैकी एक पर्याय निवडावा व Submit करावे.

समोर दिसणाऱ्या स्क्रीनमध्ये New Farmer Registration आणि Login हे दोन पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी पी.एम. किसान योजनेतील नोंदणीकृत लाभार्थ्यांनी Login या बटणावर क्लिक करावे. या ॲपच्या वापरासाठी शेतकऱ्यांकडे त्यांचा पी.एम. किसान Registration Id किंवा आधार क्रमांक असणे आवश्यक आहे. स्क्रीनवर दिसणाऱ्या Login Type मध्ये Beneficiary हा पर्याय निवडावा. पी. एम. किसान Registration Id किंवा आधार क्रमांकाच्या आधारे App वर Login करण्यासाठी GET OTP बटनावर क्लिक करावे. पी. एम. किसान योजनेसाठी रजिस्टर केलेल्या मोबाईल क्रमांकावर चार अंकी OTP प्राप्त होतो, तो OTP टाकून Login करावे. त्यानंतर पुढील स्क्रीनवर स्वतःचा सहा अंकी MPIN तयार करावा. सदर MPIN च्या माध्यमातून लाभार्थ्यास App मध्ये Login करणे तसेच e-KYC करणेसाठी उपयोग होणार आहे.

ज्या Registration Id किंवा आधार क्रमांकावरून App मध्ये Login केले आहे, त्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण प्रलंबित असेल तर “Your e-KYC is pending for completion” असा संदेश दिसेल. म्हणजेच त्या लाभार्थ्याची e-KYC प्रलंबित आहे. समोर दिसणा-या Click here to complete your e-KYC या लिंकवर क्लिक केल्यावर लाभार्थ्यांनी तयार केलेला सहा अंकी MPIN प्रविष्ठ करावा. तद्नंतर समोर दिसणाऱ्या Consent Form वर क्लिक करून Scan Face या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर समोर FaceRD App is not installed on device असा संदेश दिसल्यास Ok बटणावर क्लिक करावे. तद्नंतर गुगल प्ले स्टोअर Aadhar FaceRd (Early Access) हे App Install करण्यासाठी उपलब्ध होईल ते Install करावे. त्यानंतर मोबाईलमध्ये Capturing Face सुरू होईल, त्यामध्ये दर्शविलेल्या सूचनांचे पालन करून Proceed या बटणावर क्लिक करावे.

त्यानंतर मोबाईल समोर धरून चेहऱ्यावर प्रकाश दिसेल अशा पद्धतीने Scan Face या बटणावरती क्लिक करावे. तदनंतर Images captured successfully processing असा संदेश स्क्रिनवर आल्यानंतर Successful e-KYC असा संदेश दिसेल म्हणजेच लाभार्थ्याचे e-KYC प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. इतर लाभार्थीचे e-KYC करावयाचे असल्यास Dashboard वरील e-KYC for other beneficiaries’ या बटणावर क्लिक करावे व पुनश्चः वरीलप्रमाणे संपूर्ण प्रक्रिया करावी.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here