Eknath Shinde On Drain Cleaning: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाल्यात उतरुन कामाचा घेतला आढावा

0

मुंबई,दि.२०: Eknath Shinde On Drain Cleaning: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्वतः नाल्यात उतरुन कामाचा आढावा घेतला आहे. पावसाळ्यापूर्वी मुंबईतील अनेक नाल्यांची पाहणी एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात येत आहे. सलग दोन दिवस एकनाथ शिंदे यांनी महत्वाच्या नालेसफाईंच्या कामाचा आढावा घेतला. तसेच महापालिका अधिकाऱ्यांना इशारा देखील दिला. 

Eknath Shinde On Drain Cleaning | एकनाथ शिंदे यांनी नाल्यात उतरून…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः ओशिवरा येथील नाल्यात उतरून सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपला मोर्चा ओशिवरा येथे नाल्यात सुरू असलेल्या नालेसफाईकडे वळविला व तेथील नालेसफाईचे काम पाहिले. यावेळी त्यांनी स्वतः नाल्यात उतरून सुरू असलेल्या कामाचा आढावाही घेतला. तसेच यावेळी नालेसफाई करणाऱ्या कामगारांसोबत संवाद साधून त्यांचे काम जाणून घेतले.

रस्त्यांवरील कचऱ्याची तक्रार करता यावी, यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला केल्या आहेत. जोरदार पावसात पाणी साचून मुंबईतील नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी नाल्यातून गाळ काढण्याची कामे काटेकोरपणे पूर्ण करावीत. आवश्यक ठिकाणी पाणी साठवण भूमिगत टाक्या, फ्लडगेट्सची यंत्रणा कार्यान्वित करण्याची सूचना देखील त्यांनी दिली. नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांवर अभिप्राय नोंदवता यावा त्याचबरोबर नालेसफाईबाबत तक्रार असेल तर नागरिकांनी १ ते १० जून दरम्यान त्याची छायाचित्रे महापालिकेला पाठवावी. नालेसफाईमध्ये कुचराई करणाऱ्या कंत्राटदारावर कडक कारवाई करण्यात येईल, असे सांगतानाच संबंधित कामी हलगर्जी केल्याबद्दल अधिकाऱ्यांवर देखील कारवाई केली जाईल, असा इशारा देखील एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिला.

दहिसर येथील नद्यांच्या पात्रांना भेट देऊन तिथे सुरू असलेल्या कामाची पाहणी देखील एकनाथ शिंदेंनी केली. नदी-नाल्यांतून निघणारा गाळ तीन दिवसानंतर वाहून न्यायलाच हवा तो तिथेच ठेवल्यास पुन्हा नाल्यात जाऊ शकतो त्यामुळे त्यावर अधिक काटेकोरपणे काम करावे असे आदेश महापालिका प्रशासनाला दिले. तसेच कंत्राटदार आणि अधिकारी यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध मुंबईकरांच्या हिताच्या आड आले आणि नालेसफाई झाली नाही तर अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही मुंबई मनपा आयुक्तांना दिले. कचऱ्याच्या समस्येबाबतही तक्रारींसाठी संपर्क क्रमांक तयार करावा. नाल्यांना फ्लडगेट बसविण्याची कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला दिले. 

अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दिला दणका | Eknath Shinde

नाल्यांच्या सफाईची केवळ पाहणी करायची सवय अंगवळणी पडलेल्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी दणका दिला असून, पालिकेतील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या तडकाफडकी कारवाईमुळे पालिका अधिकारी वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मिलन सबवे येथे पाहणी करताना येथील नाला अस्वच्छ असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आले असता त्याची तातडीने दखल घेत पर्जन्य आणि जलवाहिन्या विभागाचे मुख्य अभियंता यांना त्यांनी जागेवरच कारणे दाखवा नोटीस बजावली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here