Shivaji Sawant | छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा: प्रा शिवाजी सावंत

Shivaji Sawant: प्रा. शिवाजी सावंत यांच्या हस्ते मूर्तीचे वाटप

0

सोलापूर,दि.१५: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथर शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबाची शिवसेना व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फांउडेशन यांच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे वाटप सोलापूर जिल्हा व शहरमध्ये बाळासाहेबांची शिवसेना संपर्क प्रमुख प्रा. शिवाजी सावंत (Shivaji Sawant) यांच्या शुभहस्ते विजापूर रोड येथे इंचगिरी मठात मोठया उत्साहात, भगव्या वातावरणात, ढोल ताशाच्या गजरात, जय भवानी जय शिवाजीच्या घोषणेने अतिशबाजीच्या वातावरणामध्ये करण्यात आले.

अनेक मान्यवरांची उपस्थिती

या प्रंसगी संपर्क प्रमुख प्रा. शिवाजी सावंत, जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, जिल्हाप्रमुख अमोल शिंदे MIM चे फारूख शाब्दी, शहरप्रमुख मनोज शेजवाल, लक्ष्मीकांत ठोंगे पाटील, माजी उपमहापौर नाना काळे, दिलीप कोल्हे, युवा नेते विराज पाटील, संभाजी आरमारचे श्रीकांत डोगे, नगरसेविका संगीता जाधव, उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ चौगुले, नाना मस्के, इंचगिरी मठ प्रमुख पुष्पलता पाटील, रसुल पठाण इ. मान्यवर उपस्थित होते.

Shivaji Sawant

छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्म यांना… | Shivaji Sawant

आपल्या जोशपूर्ण भाषणात संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व जाती धर्म यांना एकत्र घेऊन शेतकऱ्यांचे वंचितांचे, शोषितांना, माता भगिनीना न्याय देणारे हिंदवी स्वराज्य स्थापन केले असून त्याच विचाराने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यरत असून छत्रपतीचे राष्ट्रहिताचे प्रेरणादायी विचार घरा घरात मना-मनात पोहोचले पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी कटिबध्द राहावे, असे म्हटले.

फारुख शाब्दी, दिलीप कोल्हे, जाधव श्रीकांत डोगे यांनी समायोचित भाषण करत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल गौरव उद्गार काढले


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here