भगवा आखाडा तालमीचा पैलवान स्वप्नील काशीद याला रौप्यपदक, स्वप्नीलचे दुहेरी यश

0

सोलापूर,दि.6: नुकत्याच बालेवाडी पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य मिनी ऑलिंपिक कुस्ती स्पर्धेत सोलापूर नवी पेठ येथील भगवा आखाडा तालमीतील मल्ल पैलवान स्वप्निल प्रभाकर काशीद याने 79 किलो वजन गटात प्रेक्षणीय कुस्त्या करून सोलापूर शहरास रौप्यपदक मिळुन दिले.

पै. स्वप्नील काशीद यास वस्ताद दशरथ मिसाळ आंतरराष्ट्रीय पै.अमोद काशीद मार्गदर्शक पै.अमर दुधाळ यांचे मार्गदर्शन लाभले. पै. स्वप्नीलच्या या यशाबद्दल सोलापूर शहर तालीम संघाचे अध्यक्ष माजी आमदार रविकांत पाटील, सचिव उपमहाराष्ट्र केसरी पैलवान भरत मेकाले, राजाभाऊ देशपांडे, सुरेश वाले, दत्ताभाऊ लकडे, पैलवान राजाभाऊ परळकर, प्रा. पै. धनराज भुजबळ, पै. लखन अंजीखाने, पै. शिवाजी परळकर, राष्ट्रीय पै. नितीन खुर्द, पै.राजकुमार खरात, पै.चौबलसिंग मनसावाले, पै. महेश कोळी, पै. विठ्ठल कलाकाते, सिध्देश्वर केसरी, पै. गोपीनाथ घोडके, मराठा वाडा केसरी, पै. आतिश मोरे, महाराष्ट्र चॅम्पियन पै. अर्जुन साठे, पै. वैजुनाथ जाधव, पै. दीपक बहिरवाडे, पै. नागेश शेटे, पै.राजू शिंदे आदींनी स्वप्नील याचे कौतुक केले.

तसेच 10 ते 14 जानेवारी 2023 दरम्यान कोथरूड पुणे ते होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत 79 किलो वजन गटात गादी विभागामध्ये सोलापूर शहरातून पै. स्वप्नील प्रभाकर काशीद याची निवड झाली असून पै. स्वप्निल यास पुढील स्पर्धेसाठी पैलवान/वस्ताद मंडळी व हनुमान नगर मित्र परिवार सोलापूर यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here