सोलापूर,दि.९: Online Job Fair: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर यांचे मार्फत दिनांक १४ व १५ डिसेंबर २०२२ रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे (Online Job Fair) आयोजन करण्यात आलेले आहे. सोलापूर जिल्ह्यातील नोकरीइच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सदर ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी दिली.
Online Job Fair: शैक्षणिक पात्रता
या रोजगार मेळाव्यात १० वी, १२ वी, ट्रेनी, ग्रॅज्युएट (पदवी), बिझनेस डेव्हलपमेंट एक्सेक्युटीव्ह, केमिस्ट, नर्सिंग, बी.एस.सी., एम.एस.सी. अशा प्रकारची एकुण ४७५ पेक्षा जास्त रिक्तपदे ४ उद्योजकांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अधिसुचीत केलेली आहेत.
अडचण असल्यास या नंबरवर साधा संपर्क
नोकरी इच्छुक उमेदवारांनी सदर संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करून शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी ऑनलाईन अर्ज करावेत, जेणेकरून त्यांना मेळाव्यात सहभागी होता येईल. याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाच्या ०२१७-२९५०९५६ या दुरध्वनीवर अथवा प्रत्यक्ष जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थ कोट, पार्क चौक, सोलापुर येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त जाधव यांनी यावेळी केले आहे.
I have a job