मुंबई,दि.4: Virat Kohli | विराट कोहलीने (Virat Kohli Catch) शाकीब अल हसनचा अफलातून झेल घेतला. सोशल मीडियावर Video व्हायरल झाला आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशनं भारताचा एक विकेट आणि चार षटकं राखून पराभव केला. या सामन्यात विराट कोहलीला फलंदाजीत आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. पण क्षेत्ररक्षण करताना विराट कोहलीनं घेतलेल्या अफलातून झेलचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. शाकीब अल हसनचा हवेत झेपवत विराटनं घेतलेल्या झेलचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने शानदार झेल घेतला. त्याने वॉशिंग्टन सुंदरच्या चेंडूवर हवेत उडत हा झेल टिपला. यापूर्वी विराट कोहलीचा असाच झेल लिटन दासनेही टिपला होता.
विराट कोहलीनं घेतला शाकिबचा अफलातून झेल
बांगलादेशच्या फलंदाजीदरम्यान 24 व्या षटकात विराट कोहलीनं शाकिबचा अफलातून झेल घेतला. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत विराट कोहलीनं घेतलेला झेल पाहू शकता. झेल घेण्यासाठी विराट कोहलीला हवेत झेपवावं लागलं होतं. विराट कोहलीनं हवेत झेपवत एका हातात झेल घेतला. विराट कोहलीचा झेल पाहून भारतीय खेळाडूंसोबत बांगलादेशचे खेळाडू आणि प्रेक्षकही आश्चर्यचकीत झाले होते.

शाकिबनं केलं होतं विराटला बाद
प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीला शाकिबनं तंबूचा रस्ता दाखवला होता. शाकिबच्या गोलंदाजीवर विराटचा धेल कर्णधार लिट्टन दासने घेतला होता. विराट कोहलीला 15 चेंडूत फक्त 09 धावा करता आल्या. क्षेत्ररक्षण करताना विराट कोहलीनं शाकिबचा झेल घेत हिशोब चुकता केला. शाकिब अल हसन 29 धावांवर बाद झाला. विराट कोहलीनं शाकिबचा घेतलेला अफलातून झेल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कोहलीने शाकिबचा बदला घेतला
याआधी टीम इंडिया प्रथम फलंदाजी करत असताना विराट कोहलीला शाकिब अल हसनने बाद केले होते. विराट 9 धावा करून बाद झाला. त्याला लिटन दासने अप्रतिम झेल घेत तंबूत पाठवले. शाकिबकडून विराटचा बदला घेत तो शानदार झेल टिपून बाद झाला.