Sandeep Adke: सोलापुरातील प्रसिद्ध डॉक्टर संदीप आडके यांच्यावर वृध्द व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप

Sandeep Adke Solapur: अंगावर खरकटे पाणी का टाकले? असा जाब विचारल्याने मारहाण

0

सोलापूर,दि.13: सोलापुरातील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर संदीप आडके (Sandeep Adke) यांच्यावर वृध्द व्यक्तीला मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाणीची घटना CCTV कैद झाली आहे. गवंडी कामगार विजय चौधरी असे मारहाण झालेल्या वृद्धाचे नाव आहे. अंगावर खरकटे पाणी का टाकले? असा जाब विचारल्याने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.

डॉक्टर संदीप आडके (Sandeep Adke) यांनी फायबर काठीने वृद्ध व्यक्तीला बेदम मारहाण केली. विजय चौधरी रस्त्यावरून जात असताना आडके हॉस्पिटलमधून कुणीतरी त्यांच्या अंगावर खरकटे पाणी टाकले. डॉक्टरांनी केलेल्या मारहाणीत चौधरी यांच्या हाताला पाच टाके पडले आहेत. याबाबत पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. डॉक्टर संदीप आडके यांच्या विरोधात भादवी कलम 323, 324 504, 506 अनुसार सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

View this post on Instagram

A post shared by SolapurVarta (@solapur_varta)

विजय चौधरी हे रस्त्यावरुन जात होते. यावेळी डॉक्टर आडके यांच्या हॉस्पिटलमधून त्यांच्या अंगावर कुणीतरी खरकटं पाणी टाकलं. विजय चौधरी यांनी याबाबत हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना जाब विचारला. मात्र डॉक्टरने चौधरी यांना फायबर काठीने बेदम मारहाण केली, असा आरोप चौधरी यांनी केला आहे. मात्र, दोन्ही बाजूकडून तक्रार दाखल झाल्याने पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात गुंतले आहेत.

दरम्यान संदीप आडके यांनीही पीडित व्यक्तीविरोधात सदर बाजार पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हा व्यक्ती हॉस्पिटलमध्ये दारू पिऊन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत होता असा आरोप मारहाण करणाऱ्या डॉक्टरांनी केला आहे. त्याचबरोबर डॉक्टरांच्या फिर्यादीवरून पीडित गवंडी कामगार विजय चौधरी यांच्या विरोधातही अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here