Hyderabad: हैदराबादमध्ये विद्यार्थ्याला नग्न करून मारहाण, घटनेचा VIDEO व्हायरल

Hyderabad Crime | एका विद्यार्थ्याला वसतिगृहातील काही विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे

0

हैदराबाद,दि.१३: Hyderabad Crime | हैदराबादमध्ये विद्यार्थ्याला नग्न करून मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा VIDEO व्हायरल झाला आहे. हैदराबादमधील एका विद्यार्थ्याला वसतिगृहातील काही विद्यार्थ्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रेषित मोहम्मद यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हिमांक बन्सल असं मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचं नाव असून तो हैदराबादमधील IFHE मध्ये कायद्याचं शिक्षण घेत आहे.

याप्रकरणी पीडित विद्यार्थ्याने ११ नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केली आहे. संबंधित तक्रारीनुसार, ही घटना १ नोव्हेंबर रोजी घडली असून घटनेच्या दिवशी १५ ते २० जणांनी पीडित विद्यार्थ्याला वसतिगृहाच्या खोलीत शिरून त्याचा शारीरिक आणि लैंगिक छळ केला आहे, असं पीडित विद्यार्थ्यानं तक्रारीत म्हटलं आहे.

संबंधित विद्यार्थ्यांनी पीडित विद्यार्थ्याला धक्काबुक्की करत चुकीची वागणूक दिली. तसेच त्याच्या चेहऱ्यावर, गालावर, पोटात लाथा-बुक्क्या आणि चापटीने मारहाण केली आहे. एवढंच नव्हे तर आरोपींनी पीडित विद्यार्थ्याच्या गुप्तांगांला स्पर्श करत त्याला काही रसायने आणि पावडर बळजबरीने खाऊ घातली, असं तक्रारीत म्हटलं आहे. दरम्यान, एका आरोपी विद्यार्थ्याने आपल्या तोडांत गुप्तांग घालण्याचा प्रयत्न केला. तसेच कपडे फाडून नग्नावस्थेत मारहाण केल्याचा आरोपही पीडित विद्यार्थी बन्सलने केला आहे. याबाबतचं वृत्त ‘इंडिया टुडे’नं दिलं आहे.

या घटनेचे संतापजनक व्हिडीओज आणि फोटोज महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. याप्रकरणी ११ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी पीडित विद्यार्थ्याला धमकावलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली असून रॅगिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here