शिवराज प्रतिष्ठानचा एक दिवाळी गरिबांसोबत उपक्रम

0

सोलापूर,दि.24: ”शिवराज प्रतिष्ठान”चा एक दिवाळी गोरगरिबांसोबत हा कार्यक्रम राबवण्यात आला. शिवराज प्रतिष्ठान तर्फे गरिबांना फराळ वाटप करुण दिवाळी साजरी करण्यात आली. शिवराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. राजशेखर बिराजदार पाटील हे दरवर्षी दिवाळीनिमित्त गरिबांना फराळ वाटप करत आहेत. शिवराज प्रतिष्ठान तर्फे शहरातील विविध भागात फराळ वाटप करण्यात आले.

जाहिरात

सिव्हील चौक, स्टेशन रोड या परिसरात फराळ वाटप करण्यात आले. अंध-अपंग गोरगरीबानां फराळ वाटप करताना त्यांच्या चेहऱ्यावर आंनदी उत्साह पाहण्यास मिळाला. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळाले हीच खरी दिवाळी अशा भावना राजशेखर बिराजदार-पाटील यांनी व्यक्त केल्या. यावेळी प्रतिष्ठानचे अशोक पाटील, राजशेखर बिराजदार-पाटील, किरण गोडसे, समर्थ पाटील, प्रज्योत पाटील, अजय माशाळे, धीरज सुरवसे, हर्ष साबळे, अजय माने, अभिषेक अंबुरे,शुष्मित शिरसागर, चैतन्य चंदनशिवे उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here