सोलापूर,दि.२१: महाराष्ट्र प्रादेशिक मायुम अंतर्गत पुणे मायुम मिडटाऊन शाखा यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत कृत्रिम हात व पाय बसविणे शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शिवानुभव मंगल कार्यालय,पूर्व मंगळवार पेठ, मीठ गल्ली, चाटी गल्ली जवळ, सोलापूर येथे मोफत कृत्रिम हाथ आणि पाय बसविणेचे शिबीर आयोजित केलेले आहे. या शिबिरास पुण्याचे तज्ञ डॉक्टर आणि टेक्निशियन येणार आहेत. रविवार,दिनांक ३० ऑक्टोंबर २०२२ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्या अपंग बंधू भगिनीनि २१ ऑगस्ट २०२२ रोजी कणके मंगल कार्यालय, सोलापूर येथे घेण्यात आलेल्या शिबीरामध्ये येवून माप दिलेले आहेत फक्त आणि फक्त अशाच संबंधित ३३१ अपंग दिव्यांग लाभार्थींनी त्यांचे मापाचे तयार झालेले कृत्रिम हात आणि पाय या शिबिरास येवून बसवण्याचा लाभ घ्यावा. नियोजित वेळेतच सर्व लाभार्थीनी येवून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सदर शिबिर यशस्वी करण्याकरिता सुरज करण सांस्कृतिक व बहुद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी, मनीष उपाध्ये मित्र परीवार आणि आशिष उपाध्ये मित्र परिवारचे विशेष सहकार्य लाभत आहे.
मनीष सूरेश उपाध्ये 9422457254/ 9175778578 व आशिष सुरेश उपाध्ये 9423588410 यांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.