सोलापूर,दि.६: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जन्मदिनी शिक्षक दिनी सालादाप्रमाणे गुरूविद्या प्रतिष्ठानचे यंदाही गुरूविद्या आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे प्रतिष्ठानचे नुतन अध्यक्ष सातलिंग शटगार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली आहेत.
यंदाच्या वर्षी आदर्श शिक्षक पुरस्काराची निवड समितीचे काम सोमशेखर भोगडे, सातलिंग शटगार, राजश्री तडकासे, श्रीदेवी यळमेली, श्रीदेवी यळमेली, रेणुका हब्बू, अरूणा हणंमगाव, नमिता थिटे, मोहन भूमकर, प्रा. प्रभाकर नागणसुरे यांनी पुरस्कारासाठी सात जणांची निवड केली.
यंदाच्या वर्षी पुरस्कार प्राप्त शिक्षक राखी देवानंद देशमाने ( मुख्याध्यापिका) श्री चतुराबाई श्राविका प्राथमिक शाळा, सोलापूर, शैलजा श्रीशैल स्वामी (मुख्याध्यापिका) कै.आशश्या अरकाल आंध्रभद्रावती मराठी विद्यालय सोलापूर, अंजली शिरसी (सहशिक्षिका) सेवासदन प्रशाला सोलापूर, कविता औदप्पा पुजारी (सहशिक्षिका) अण्णासाहेब पाटील विद्यालय सोलापूर, प्राध्यापक कल्लप्पा रामचंद्र उस्तरगे (एस.व्ही.एस.कनिष्ठ महाविद्यालय) भवानी पेठ सोलापूर, अण्णाराव नागनाथ खंडागळे (कलाशिक्षक) माढा, आकाश अनिल मिस्किन (क्रिडाशिक्षक) अरिहंत इंग्लिश मिडीयम स्कूल घरकुल सोलापूर यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.
गुरुविद्या आदर्श पुरस्काराचे दि. ११/९/२२ रविवार रोजी दुपारी ०४/०० वाजता समाज कल्याण केंद्र रंगभवन शेजारी वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
पुरस्काराचे स्वरूप शाल, स्मुतीचिन्ह प्रमाणपत्र, मोत्याचे माळ असं असणार आहे. तरी या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सचिवा सौ श्रीदेवी यळमेली यांनी केले आहे