दि.14: व्हॉट्सॲपवर मेसेज (WhatsApp Scam) पाठवून अनेकांना यापूर्वी फसवण्यात आले होते. भारतात जुन्या व्हॉट्सॲप स्कॅमद्वारे (WhatsApp Scam) युजर्सना पुन्हा टार्गेट केले जात आहे. फसवणूक करणारे स्कॅमर्स ‘KBC Jio’ लकी ड्रॉचे बनावट संदेश पाठवून वापरकर्त्यांना फसवण्याचा प्रयत्न करतात.
WhatsApp वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. WhatsApp he सर्वाधिक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ॲप आहे. यामुळे ऑनलाईन फसवणूक करणारे याचा फायदा घेतात. यापूर्वीही अनेकदा अशा घटना घडल्या आहेत.
WhatsApp वर आलेल्या या मेसेजमध्ये यूजर्सना एक व्हिडिओही पाठवण्यात येतो. व्हिडिओमध्ये, वापरकर्त्यांना बक्षीस जिंकण्याची संपूर्ण प्रक्रिया सांगण्यात आलेली असते. याशिवाय यूजर्सकडून त्यांचे वैयक्तिक तपशीलही विचारले जातात. यामध्ये आधार कार्ड, पासपोर्ट साइज फोटो आणि इतर तपशील विचारले जातात.
तपशील दिल्यानंतर, एक कागदपत्र वापरकर्त्यांना पाठविला जातो. ज्यामध्ये त्यांना कराच्या नावावर काही हजार रुपये पाठवण्यास सांगितले जाते. फसवणाऱ्या स्केमर्सकडून दावा केला जातो की ही रक्कम भरल्यानंतर त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील.
अशा कोणत्याही मेसेजला उत्तर देऊ नका. केबीसी (KBC) हा लोकप्रिय शो आहे. त्यामुळे अनेकजण या घोटाळेबाजांच्या जाळ्यात फसतात. स्कॅमर वापरकर्त्यांना खात्री देण्यासाठी व्हॉट्सॲपवर मेसेजसह KBC लोगो आणि Sony Livचा फोटो देखील पाठवतात.
अशा फ्रॉड मेसेजमध्येही तुम्हाला अनेक चुका दिसतील. फसवणूक करणाऱ्या स्कॅमर्सचे मेसेज इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये पाठवले जातात. बऱ्याच प्रकरणांमध्ये, वापरकर्त्यांना याबद्दल व्हॉइस मेसेज देखील मिळतात. यामध्ये वापरकर्त्यांना लॉटरी क्रमांकही दिला जातो जो खोटा असतो.