दि.30: अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) बहुचर्चित ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाचा ट्रेलर (Laal Singh Chaddha Trailer) प्रदर्शित झाला आहे. आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाच्या मागच्या बऱ्याच काळापासून सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा ट्रेलर पाहिला आहे. 2018 नंतर आमिर पुन्हा रुपेरी पडद्यावर दिसणार म्हणजे हा चित्रपट सुपरहिट होणार असंही बोललं जात आहे. तर दुसरीकडे ‘लाल सिंह चड्ढा’चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर लोकांनी सोशल मीडियाद्वारे संताप व्यक्त केला आहे.
ट्रेलर पाहून का संतापले लोक?
आमिरचा हा चित्रपट ‘फॉरेस्ट गम्प’ या हॉलिवूड चित्रपटाचा रिमेक आहे. हॉलिवूड चित्रपटाचा ‘लाल सिंह चड्ढा’ रिमेक असल्यामुळे नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच याआधी आमिरने देश असहिष्णू झाला आहे यांसारखी काही वादग्रस्त विधानं केली होती. यावरुन पुन्हा एकदा चाहत्यांनी त्याला सुनावलं असून यालाच धरुन #boycottlalsinghchaddha ट्विटरवर ट्रेंड होत आहे.
एका युजरने ट्विटरद्वारे म्हटलं आहे की, “एकीकडे आमिर म्हणतो देश असहिण्षु झाला आहे आणि मी भारत सोडू इच्छितो.” इतकंच नव्हे तर दुसऱ्या युजरने म्हटलं आहे की, “करीना कपूर स्वतः बोलते मी माझे चित्रपट पाहात नाही. तुम्ही देखील हा चित्रपट पाहण्यासाठी जाऊ नका.”