माजी सरपंचासह ९ जणांची खुनी हल्याप्रकरणी निर्दोष मुक्तता

0

सोलापूर,दि.२०: खुनी हल्याप्रकरणी माजी सरपंचासह ९ जणांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. यात हकिकत अशी की, आरोपी १ ) तुकाराम संदिपान पवार, २ ) अमोगसिध्द कुबेर पवार, ३ ) पांडुरंग संदिपान पवार, ४ ) प्रसाद संजय पवार, ५ ) मारुती भिमा पवार, ६ ) कुबेर भिमराव पवार, ७ ) संतोष मारुती पवार, ८ ) महादेव यशवंत पवार, ९ ) शंकर संदीपान पवार सर्व रा. मु. पो. गुंजेगांव, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर यांची फिर्यादी नवनाथ दत्तात्रय पाटील यांच्यावरती डोळयात लाल तिकट टाकुन खुनी हल्ला केल्याप्रकरणी प्रथम न्यायदंडाधिकारी व्ही. बी. चव्हाण यांनी निर्दोष मुक्तता केली.

सदर प्रकरणातील हकिकत अशी की, दि.०३ / ०७ / २०१७ रोजी रात्री ९.३० वाजाच्या सुमारास फिर्यादी नामे नवनाथ दत्तात्रय पाटील हे गावातील तालमीच्या कट्टयावर इतर मित्रांसोबत बसले असता, सदर आरोपी हे मागिल भांडणाचा राग मनात धरुन सदर फिर्यादी व इतरांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच सदर आरोपींनी त्यांच्या सोबत आणलेले लाल तिकट फिर्यादी व इतर लोकांच्या डोळयात घालून त्यांच्यावरती काठी, चाकु व लोखंडी रॉड यांच्या सहाय्याने खुनी हल्ला चढविला. त्यामुळे फिर्यादी नामे नवनाथ दत्तात्रय पाटील यांनी दि.०४ / ०७ / २०१७ रोजी मंद्रुप पोलीस स्टेशन येथे सदर ९ आरोपींविरुध्द फिर्याद दिली.

सदर प्रकरणी सरकार पक्षातर्फे एकुण ४ साक्षीदार तपासण्यात आले. सदर आरोपींतर्फे ॲड. अभिजीत इटकर यांनी असा युक्तीवाद केला की , सदर आरोपीं विरुध्द कोणताही सबळ पुरावा मिळून न आल्यामुळे सदर आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात यावी.

सदर आरोपींतर्फे केलेला युक्तीवाद ग्राहय धरुन प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सोलापूर यांनी सदर आरोपींची निर्दोष मुक्तता केली. यात आरोपीतर्फे ॲड. अभिजीत इटकर, ॲड. युवराज आवताडे , ॲड. मनोज व्हनमारे, ॲड. संजय सुरवसे यांनी काम पाहिले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here