नवी दिल्ली,दि.22: 7th Pay Commission Salary: केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारक BRESBI कडून महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) मध्ये वाढ होण्याची वाट पाहत आहेत. दरम्यान, केंद्र सरकार लवकरच महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत वाढ करण्याची घोषणा करणार असल्याच्या बातम्या येत आहेत. साधारणपणे, केंद्र सरकार जानेवारी आणि जुलैमध्ये वर्षातून दोनदा DA मध्ये सुधारणा करते, ज्याची अधिकृत घोषणा नंतर केली जाते. जर सरकारने डीए वाढवला तर कर्मचाऱ्यांचे पगार किती वाढणार?
महागाई भत्ता किती वाढणार? | 7th Pay Commission Salary
केंद्र सरकार पुन्हा एकदा महागाई भत्त्यात वाढ करणार आहे. सीपीआय-आयडब्ल्यूच्या आकडेवारीनुसार, सरकार महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ करू शकते, असे सांगितले जात आहे. ही वाढ 7 व्या वेतन आयोगांतर्गत कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी केली जाणार आहे, जी जुलै 2024 पासून लागू होईल.
कर्मचाऱ्यांचे पगार किती वाढणार?
सरकारने कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढवला, तर आगामी DA वाढ टेक होम पगारात जोडली जाईल. जर एखाद्याचा मूळ पगार 55,200 रुपये असेल तर त्याचा 50% महागाई भत्ता 27,600 रुपये आहे. तर महागाई भत्ता 53 टक्के वाढल्यास त्यांचा महागाई भत्ता 29,256 रुपये होईल. म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या पगारात 29,256 रुपये – 27,600 रुपये = 1656 रुपये वाढ होतील.
1 कोटी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना मूळ वेतनाच्या 50% डीए, तर निवृत्तीवेतनधारकांना मूळ पेन्शनच्या 50% DR मिळेल. शेवटच्या वेळी 7 मार्च 2024 रोजी डीए वाढवण्यात आला होता. ही वाढ 1 जानेवारी 2024 पासून लागू होणार आहे. गेल्या वर्षी, 1 जुलै 2023 पासून लागू होणारी DA वाढ, 18 ऑक्टोबर 2023 रोजी जाहीर करण्यात आली होती. डीए रिव्हिजनसाठी सरकारची अंतिम मुदत लक्षात घेता, पुढील वाढ लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा आहे. या वाढीमुळे एक कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.
महागाई भत्ता कसा मोजला जातो?
महागाई भत्ता कसा वाढेल हे CPI-IW डेटावर अवलंबून आहे. ही आकडेवारी कामगार मंत्रालयाकडून दर महिन्याला जाहीर केली जाते. या आकडेवारीच्या आधारे सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात किती वाढ करायची हे ठरवले जाते.
फॉर्म्युला- 7वा वेतन आयोग DA% = [{12 महिने AICPI-IW आकडा (आधारभूत वर्ष 2001=100) – 261.42}/261.42×100]