सोलापूर,दि.23: सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्ण संख्येत वाढ होत आहे. दुसऱ्या लाटेत सोलापूर शहर व जिल्ह्यातील अनेक भागात रुग्ण संख्येने थैमान घातले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सोलापूर शहर व जिल्ह्यात अनेकांचा मृत्यू झाला. आता अनेकांनी लस घेतल्याने कोरोनाचा इतका प्रभाव दिसून येत नाही. लसीकरण महत्वाचे आहे, त्यामुळे सर्वांनी कोरोनाची लस घेणे गरजेचे आहे.
सोलापूर जिल्हा ग्रामीण 1874 अहवाल प्राप्त झाले, यात 1288 निगेटिव्ह तर 586 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 351 पुरुष व 235 महिलांचा समावेश आहे. 3 जणांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 3314 आहे. आज बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 196 आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 180151 झाली आहे. तर यापैकी 173147 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 3690 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 2397 पुरुष व 1293 महिलांचा समावेश आहे.
सोलापूर शहर 705 अहवाल प्राप्त झाले. यात 534 निगेटिव्ह तर 171 पॉझिटिव्ह निघाले आहेत. यात 88 पुरुष व 83 महिलांचा समावेश आहे. 3 जणांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर शहर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 2182 आहे. आज बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 106 आहे. सोलापूर शहर आतापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या 32167 झाली आहे. तर यापैकी 28506 जणांनी कोरोनावर मात केली आहे तर 1479 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 943 पुरुष व 536 महिलांचा समावेश आहे.





