सोलापूर जिल्हा ग्रामीण 154 जणांनी केली कोरोनावर मात, कोरोना रुग्ण संख्येत मोठी वाढ

0

सोलापूर,दि.19: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सोलापूर जिल्ह्यात कोरोना (Covid-19) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मध्यंतरी कमी होत असलेली रुग्ण संख्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत पुन्हा वाढत आहे. तिसऱ्या लाटेतील सर्वाधिक रुग्णांची संख्या वाढली आहे. सोलापूर जिल्हा ग्रामीण नवीन 472 रूग्णांची भर; एकूण रुग्ण संख्या 177715 झाली आहे.रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या 172266 झाली आहे.तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 1768 आहे.तर आजपर्यंत मृतांची संख्या 3681 झाली आहे. यात 2391 पुरुष व 1290 महिलांचा समावेश आहे.सोलापूर जिल्हा ग्रामीण आज 1880 अहवाल प्राप्त झाले. यात 1408 निगेटिव्ह तर 472 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात 302 पुरुष आणि 170 महिलांचा समावेश आहे. आज 2 जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर 154 जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here