योगी आदित्यनाथ यांनी केली सुशीलकुमार शिंदे यांच्यावर टीका

0

सोलापूर,दि.1: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सोलापुरात लोकसभा उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ सभा झाली. यावोळी योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस नेते माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर टीका केली. कर्णिक नगर येथील वल्याळ क्रीडांगणावर योगींची सभा झाली. काँग्रेसच्या ‘फॅमिली फर्स्ट’ या वृत्तीमुळे भारताचे प्रचंड नुकसान झाले आहे, असे योगी म्हणाले.

महाराष्ट्रातल्या शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांचं श्रीराम जन्मभूमी आंदोलनात मोठं योगदान असल्याचंही योगी आदित्यनाथ म्हणाले. योगी आदित्यनाथ यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या हिंदू दहशवादाच्या वक्तव्यावर जोरदार टीका केली.

‘आपल्या धर्माचे रक्षण हे लोक करू शकत नाहीत. ही तीच काँग्रेस आहे, राम मंदिराच्या बाबत प्रश्नचिन्ह उभं केलं जात होतं. काँग्रेसने हिंदू दहशवाद म्हणून सांगितलं. आता तेच लोक खुनी पंजासोबत तुमच्याकडे येत आहेत. हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्यांना मत देणार असाल, तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही’, अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांच्यावर केली.

सोलापूरकरांनो, तुमचे एक मत जर चुकीच्या दिशेने गेले तर पुन्हा आतंकवादाला चालना मिळेल, मात्र नरेंद्र मोदींना मत म्हणजे, देशाच्या  प्रगतीला मत जाईल, त्यामुळे काँग्रेसचे मनसुभे उधळून लावा पुन्हा सुरक्षित मोदींच्या हातात देश द्या असे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here