Yog Sevak Swami Sivananda: 125 वर्षाच्या योग सेवक स्वामी शिवानंद यांना पद्मश्री पुरस्कार

0

दि.21: Yog Sevak Swami Sivananda: योग क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे योग सेवक स्वामी शिवानंद (Swami Sivananda) यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. स्वामी शिवानंद हे पद्मश्री पुरस्कार मिळवणारे कदाचित सर्वात वृद्ध भारतीय असतील. ‘योग सेवक’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या वाराणसीमधील 125 वर्षांच्या स्वामी शिवानंद यांना आज पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.

हा पुरस्कार घेण्यासाठी उठलेल्या स्वामी शिवानंद यांनी प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दंडवत घातलं. नंतर त्यांनी राष्ट्रपतींना दंडवत घातलं. स्वामी शिवानंद यांना पुरस्कार देण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद स्वत: जागेवरुन उठून त्यांच्याजवळ आले आणि त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

वाराणसी येथील 125 वर्षाच्या स्वामी शिवानंद यांनी त्यांचे आयुष्य हे भारतीय जीवन पद्धती आणि योगाच्या प्रसारासाठी खर्ची केलं. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना यावर्षीचा पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे. त्या पुरस्काराचे वितरण आज राष्ट्रपती भवनमध्ये केलं गेलं.

पंतप्रधानांना, राष्ट्रपतींना दंडवत

पद्मश्री पुरस्कार घेण्यासाठी जेव्हा स्वामी शिवानंद यांचं नाव पुकारण्यात आलं त्यावेळी त्यांनी सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जवळ जाऊन त्यांना दंडवत घातला. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या जवळ जाऊन त्यांनाही दंडवत घातला. त्याचवेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आपल्या जागेवरून उठले आणि त्यांनी स्वामी शिवानंद यांना उठवलं. नंतर त्यांनी स्वामी शिवानंद यांना हा पुरस्कार प्रदान केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here