अक्कलकोट, दि. 26 : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आता खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले आक्रमक झाले असून त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी संभाजीराजेंनी यासंदर्भात घोषणा केली होती, शनिवारपासून मुंबईच्या आझाद मैदानात संभाजीराजे भोसलेंनी उपोषणाला सुरुवात केली आहे
यास पाठिंबा म्हणून सकल मराठा समाज अक्कलकोट शहर व तालुक्याच्यावतीने समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी अक्कलकोट तहसिल कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यास विविध पक्ष, सामाजिक संघटनेने पाठिंबा दिला होता. दरम्यान राष्ट्रमाता जिजाऊ प्रतिमेचे व शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजाचे अमोलराजे भोसले, महेश इंगळे, सुरेशचंद्र सुर्यवंशी, बाबासाहेब निंबाळकर, सुधाकर गोंडाळ, अरविंद साळुंखे, अमर शिंदे, मनोज निकम, प्रविण घाडगे, योगेश पवार, प्रविण देशमुख, संतोष जाधव, मंगेश फुटाणे, शितल जाधव, वैभव नवले, राम मातोळे, मनोज इंगोले, मेजर जाधव, मनोज गंगणे, आकाश शिंदे, निखिल पाटील, बालाजी पाटील, सागर गोंडाळ, प्रशांत भगरे, आकाश पवार, अतिश पवार, लक्ष्मण खोडवे, विजय माने, मोहन चव्हाण, माया जाधव आदीजण उपस्थित होते.
समाजाने तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा मूळ पाया असलेला न्या.गायकवाड राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल नाकारला व मराठा आरक्षण रद्द केले. या निकाला विरोधात राज्य सरकारने रिव्ह्यू पिटीशन दाखल केले आहे.
हातातोंडाशी आलेला आरक्षणाचा घास हिरावल्यानंतर पुन्हा आरक्षण मिळवण्यासाठी खुप काम दिर्घकाळ करावे लागणार आहे. मग ते 50 टक्केच्या आत ओबीसीतून असो कि 50 टक्केच्या बाहेर असो. राजेंनी आज रोजी ओबीसीतून आरक्षण मागितल्याने यात काही फरक पडेल अशी सुतराम शक्यता नाही. म्हणजे वादाचं वादळ उभे राहिल मात्र हातात लगेच तरी काही येणार नाही. उलट ज्या सवलती मिळवून समाजाच्या पदरात काहीतरी टाकता येऊ शकेल तेही मागे पडेल. पुन्हा तोच प्रश्न तसाच समोर असेल, समाजाचं,आजच्या तरुण पिढीचं काय?
संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या हा ला हा मिळवत सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळ, वस्तीगृहे, प्रलंबित नियुक्त्या, अधीसंख्य जागा व पदे अशा मागण्या लावून धरल्या आहेत. सारथीचं उदाहरण समोर आहे. मागील वर्षी स्पर्धा परीक्षेतील मराठा विद्यार्थ्यांना सारथीच्या माध्यमातून शिष्यवृत्ती सारख्या सवलती मिळाल्या, अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाले आणि आज अधिकारी म्हणून मार्गस्थ होऊ शकले. अन्वयार्थ असा कि, आरक्षणाचा अडलेला गाडा पुढे सरकत नाही तोपर्यंत अशा भवितव्य घडवणार्या सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजना, वस्तीगृहे यांसारख्या सवलतीही पदरात पाडून घ्यायचेच! या करिता संभाजीराजे छत्रपती ज्या -ज्या वेळी हाक देतील त्या त्या वेळी अक्कलकोट शहर तालुक्यातील सकल मराठा समाज आंदोलनात सहभागी होणार आहे, असे सकल समाजाच्या वतीने सांगण्यात आले.
याप्रसंगी या लाक्षणिक उपोषणास ‘मी वडार महाराष्ट्राचा’, अक्कलकोट शहर तालुका भाजपा, कोळी महासंघ, विश्व ब्राम्हण समाज, बेलदार भटका समाज संघ, प्रहार संघटना, छत्रपती प्रतिष्ठान मैंदर्गी, लहुजी शक्ती सेना, आरपीआय (आठवले गट), मातंग समाज पंचकमेटी, जाकिर शेरीकर, सुनिल खवळे यांनी पाठिंबा पत्र उपोषण स्थळी येऊन दिले.
दरम्यान सकल समाजाच्यावतीने तहसिलदार बाळासाहेब शिरसट यांचे प्रतिनिधी संजय सोनटक्के यांना निवेदन देण्यात आले.या लाक्षणिक उपोषणास वैभव मोरे, प्रथमेश पवार, रणजित गोंडाळ, भरत राजेगावकर, गणेश पाटील, फहिम पिरजादे, विशाल कलबुर्गी, काशिनाथ कदम, गोविंदराव शिंदे, योगेश पवार, टिनू पाटील, महेश दणके, आकाश सुर्यंवंशी, रणजित जाधव, रावसाहेब मोरे, पवन निकम, सुनिल शिंदे, अजय मोरे, सिध्दाराम नरवडे, नागेश रेड्डी, निखिल निकम, शिवबा जाधव, प्रसाद मोरे, गणेश पाटील, चेतन भोसले, अमर पोतदार, राम आवटे, किरण साठे, अक्षय जाधव, आकाश गडकरी, अंकुश मोरे, सुनिल जाधव, नंदकिशोर चव्हाण, अमरदिप पाटील, दादासाहेब मोरे, गणेश लांडगे, लहु मोरे, शरण सुरवसे, ऋशिकेष लोणारी, राहूल चव्हाण, मल्लिकार्जून विलोगीकर, सागर सोमवंशी, रवि पोळ, अभिषेक चव्हाण, पिंटू शिंदे यांच्यासह बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक योगेश पवार यांनी केले. निवेदन दिलेल्या संघटना, पक्ष यांचे आभार प्रविण घाडगे यांनी मानले.