Yavatmal Accident | एसटी बस आणि कारचा यवतमाळमध्ये भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

यवतमाळमध्ये (Yavatmal Accident News) झालेल्या अपघातात 13 प्रवासी गंभीर जखमी

0

यवतमाळ,दि.4: एसटी बस आणि कारचा यवतमाळमध्ये भीषण अपघात (Yavatmal Accident) झाला आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. यवतमाळमध्ये (Yavatmal Accident) रविवारी (4 डिसेंबर) एका एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाला. यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 13 जण गंभीर जखमी झाले आहेत. अमरावतीवरून (Amravati) यवतमाळला येणाऱ्या एसटी ( क्रमांक, एमएच 06 एस 8826) आणि टीयगो कार ( क्रमांक, एमएच 29 बीसी 9173) यांची समोरासमोर धडक झाली.

अपघातात 4 जणांचा मृत्यू

जखमींवर यवतमाळच्या जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. राधेश्याम इंगोले (रा. यवतमाळ), रजनी इंगोले (रा. यवतमाळ ), वैष्णवी गावंडे ( रा. वाशिम ) आणि सारीका चौधरी ( रा. पुसद यवतमाळ ) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर साक्षी प्रमोद चौधरी ( रा. पुसद ), प्रमोद पांडुरंग चौधरी, सारीका संतोष गावंडे आणि संतोष गावडे अशी जखमींची नावे आहेत.

जाहिरात

लग्न सोहळ्यावरून परत येत असताना अपघात

रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झालाय. लग्न सोहळ्यावरून परत येत असताना काळाने घाला घातलाय. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गावंडे, चौधरी आणि इंगोले कुटुंबीयांच्या नातेवाईकांचे 3 डिसेंबर रोजी अमरावतीमधील नांदगाव खंडेश्वर येथे लग्न होते. या लग्नसोहळा अटोपून आज सकाळी यवतमाळकडे परत येत होते. यावेळी विरुद्ध दिशेने जात असलेल्या एसटी बसने कारला समोरून जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये वाहनातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील तिघांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथे हलवण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here