सोलापूर,दि.१४: सोलापूर सोशल फौंडेशन व इतर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कोविड काळात केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल आमदार सुभाष देशमुख यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडनतर्फे पुणे येथे सर्टिफिकेट ऑफ कमिंटमेंट हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचे उपाध्यक्ष मेहबूब सय्यद, कार्यकारी सदस्य सिकंदर सय्यद यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा, सोलापूर सोशल फाउंडेशनचे संचालक रविंद्र मणियार, मयुरी वाघमारे व सोलापूर सोशल फाउंडेशनचे सल्लागार अमोल उंबरजे यांची प्रमुख उपस्थिती होती.
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचा पुरस्कार सोलापूर जिल्ह्याला प्रथमच मिळण्याचा मान आ. सुभाष देशमुख यांच्याकार्यामुळे मिळाला आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल आ. देशमुख यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.
Home सोलापूर वार्ता आमदार सुभाष देशमुख यांना वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डचा सर्टिफिकेट ऑफ कमिंटमेंट पुरस्कार