संभाजी ब्रिगेडचा महिलादिनी पाण्यासाठी महिलांचा महानगरपालिकेवर घागर मोर्चा

0

सोलापूर,दि.8: सोलापूरातील तुळजापूर नाका येथील दत्तनगर मंठाळकर वस्ती, संभाजीनगर, चंद्रबल, रामनगर, लक्ष्मीनगर या नगरांमधील पाण्याच्या प्रश्नामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने महिलादिनी महिलांचा घागर मोर्चा महानगरपालिकेवर काढण्यात आला.

या नगरात पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी नाही रस्ते पाणी ड्रेनेज या मूलभूत सुविधांची वनवा आहे त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांना पिण्याच्या पाणीपुरवठ्यासाठी टँकरद्वारे दोन तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता. पण गेल्या महिन्यापासून या भागातील नागरिकांना सात-आठ दिवसा आड टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणी हे जीवनावश्यक बाब असून पाण्याविना येथील नागरिकांचे हाल होत आहेत त्यामुळे या भागातील महिला आज एकत्र येऊन महानगरपालिका घागर मोर्चा काढण्यात आला.

तसेच त्यातील काही संतप्त महिलांनी या ठिकाणी मटका फोडून आपला तीव्र संताप व्यक्त केला यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष श्याम कदम, जिल्हा उपाध्यक्ष रमेश जाधव, दत्ता जाधव, सुनील सोनवणे, महादेव बडवणे, कर्णिक स्वामी, उमेश सुरवसे, रमेश सुरवसे, नंदकुमार सुरवसे, मारुती आवळे, यल्लाप्पा शिंदे, नबीलाल शेख, प्रकाश सोनवणे, रमेश जाधव, अंजू कटारी, दत्ता पवार, विलास शिरसागर, संदीप नरवडे, धानम्मा मडकी, अहिल्या भोकरे, भिमाबाई बडवणे, साक्षी शेलार, इंदुमती बिराजदार, संगीता देडे, सविता निंबाळकर, सुनीता जाधव, सुजाता बिराजदार, शिल्पा निंबाळकर, शिरसागर लक्ष्मी सोनवणे, शैला सोनवणे, महानंदा कोणचे, आदीसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी सोलापूर आयुक्त यांनी निवेदन दिले असता त्यांनी त्या भागांमध्ये नागरिकांनी त्याचा भरलेला पाहिजे आणि आपली घरे नावावर केली पाहिजे तसेच या भागातील नागरिक आणि बांधकाम परवाने काढलेले पाहिजे तरच आम्ही त्या ठिकाणी पाणीपुरवठा करावा अन्यथा त्या ठिकाणी पाणीपुरवठा केले जाणार नाही तसेच तेथील घर आम्ही अतिक्रमण म्हणून काढून टाकू असा वक्तव्य केले आहे

सोलापूर शहरांमध्ये जवळपास 70 ते 75 टक्के बांधकाम परवाने न करता कितीतरी अनधिकृत अतिक्रमणे आणि बांधकाम झालेले आहेत तिकडे आयुक्त साहेबांचं लक्ष नाही गोरगरिबांच्या घरावर हातोडा फिरवायचे बंद करावे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मूलभूत सुविधा महानगरपालिका पुरवू शकत नाही त्याच्यासारखे दुर्दैवी नाही त्यामुळे मी सोलापूर व महानगरपालिका आयुक्तांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here