महिलेचा गोळीबारात मृत्यू पोलिस कर्मचाऱ्याने केली आत्महत्या

0

दि.10: कोलकातामध्ये आज गोळीबार झाला आहे. तेथे उपस्थित असलेल्या बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर एका पोलिसाने गोळीबार केला. बंदुकीतून गोळी लागल्याने एका महिलेचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. नंतर त्या पोलिसाने स्वतःवरही गोळी झाडली.

मृत महिला ही दुचाकी चालवत होती. सध्या पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करत आहेत. हल्ला करणारा पोलीस जवळपास तासभर त्याच ठिकाणी फिरत होता, अशी माहिती मिळाली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here