वंचितच्या उमेदवाराची निवडणुकीतून माघार घेणे हे मोठे षडयंत्र: शहाजी पवार

0

सोलापूर,दि.22: सोलापूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे राहुल गायकवाड यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांची निवडणूक रिंगणातून माघार हे महाविकास आघाडीतील मोठ्या नेत्याचे षडयंत्र असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी केला आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना माझ्या अर्धवट लढण्यामुळे भाजप नेत्याला आपण वाट मोकळी करतोय. त्यांना सोयीचे करतोय, याची मला काळजी वाटत होती. माझ्यामुळे भाजपचा एक नेता संसदेत जाईल आणि संविधानाला धोका होईल. असे वक्तव्य केले होते.

या संदर्भात भूमिका स्पष्ट करताना भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार बोलत होते. आजपर्यंत काँग्रेससह महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी लोकशाहीचा अनादर केला. हा इतिहास आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात एमआयएम ने उमेदवार न देणे, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने गुपचूप माघार घेणे, हे सर्व प्रकार लोकशाहीला घातक आहेत. एमआयएम ने उमेदवार न देणे व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने निवडणूक रिंगणातून माघार घेणे. या दोन्ही घटना मागे महाविकास आघाडीतील मोठ्या नेत्यांचा हात असल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या विकासाच्या बळावर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार राम सातपुते हे निवडून येणार यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेली घटना, लोकशाही काँग्रेस व महाविकास आघाडीतील घटक पक्ष मोडीत काढत आहेत. ही दुर्दैव बाब असल्याचे पुढे बोलताना शहाजी पवार म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here