या कृतीने पुन्हा या मुख्यमंत्र्यांनी जिंकली सर्वांची मनं

0

चेन्नई,दि.1: मंत्री, मुख्यमंत्री म्हटले की व्हिआयपी कल्चर आले. मुख्यमंत्र्याचा ताफा निघाला की रस्त्यावरील सर्व वाहनं थांबविली जातात. जोपर्यंत मुख्यमंत्र्याचा ताफा निघून जात नाही तोपर्यंत त्या ठिकाणी इतर वाहनांना प्रवेश दिला जात नाही. पण या सर्वाला तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (MK Stalin) अपवाद ठरत आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (MK Stalin) यांनी सर्वांची मनं जिंकली आहेत.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन नेहमीच आपल्या खास शैलीतून सर्वांची मनं जिंकत असतात. दोन दिवसापूर्वी, त्यांनी सरकारी बसमधून प्रवास केला. त्यांच्या या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधले असतानाच आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्यांनी व्हिआयपी कल्‍चरला फाटा मारत सर्वसामान्यांना स्थान दिले असल्याचे पाहायला मिळत आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा ताफा आज वेलाचेरीहून कोयंबेडूच्या दिशेने निघाला होता. यादरम्यान वाटेत त्यांच्या ताफ्याच्या मागे एक रुग्णवाहिका आली. मुख्यमंत्र्यांना रुग्णवाहिकेचा आवाज येताच त्यांनी ताफ्याचा वेग कमी केला आणि त्यांना बाजूला होण्यास सांगितले.

स्टॅलिन यांच्या या सूचनेनंतर ताफ्यातील सर्व वाहनांचा वेग कमी करण्यात आला आणि रुग्णवाहिकांसाठी मार्ग मोकळा करण्यात आला. त्यांच्या या भूमिकेने सर्वांचे मन त्यांनी जिंकले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here