पंतप्रधानपदासाठी जनतेची पसंती कोणाला, सर्व्हेतून माहिती समोर

0

नवी दिल्ली,दि.२१: पंतप्रधानपदासाठी जनतेची पसंती कोणाला याबाबत सर्व्हेतून माहिती समोर आली आहे. देशात २०२४ साली लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. १८ व्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेतून पायउतार करण्यासाठी विरोधक ‘इंडिया’ आघाडीच्या नेतृत्वाखाली एकत्र आले आहेत. पण, २०२४ साली जनतेची पंतप्रधानपदासाठी कोणाला पसंती आहे? याचा एक सर्व्हे समोर आला आहे.

पंतप्रधानपदासाठी जनतेची पसंती कोणाला

‘एबीपी’ आणि ‘सी व्होटर्स’ने छत्तीसगढमध्ये सर्व्हे केला आहे. या सर्व्हेत ११ लोकसभा आणि ९० विधानसभा क्षेत्रातील जनतेची मते जाणून घेण्यात आली आहेत. त्यामध्ये १८ वर्षांवरील ७६७९ जणांनी सर्व्हेत भाग घेतला होता. २०२४ साली होणाऱ्या निवडणुकीत पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना जनतेनं सर्वाधिक पसंती दिली आहे. तर, दुसऱ्या क्रमाकांवर राहुल गांधींना जनतेनं पसंती दिली आहे.

सर्व्हेमध्ये ६२ टक्के लोकांनी नरेंद्र मोदी पंतप्रधानपदासाठी पसंती दर्शवली आहे. तर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केवळ ३ टक्के लोकांनीच पसंती दिली आहे. मोदी यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी आहेत. त्यांना २० टक्के लोकांनी पंतप्रधानपदासाठी पसंती दाखवली आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ६ टक्के, तर अन्य नेत्यांना ९ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here