चित्रपटगृहात ‘The Kashmir Files’ चित्रपट सुरू असताना काही प्रेक्षकांनी दिल्या पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा

0

दि.२०: विवेक अग्निहोत्रीचा (vivek agnihotri) चित्रपट ‘द कश्मीर फाइल्स’ (the kashmir files) सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम करताना दिसत आहे. तर दुसरीकडे या चित्रपटावरुन राजकारणही चांगलेच तापले आहे. काश्मीरमधील पंडितांवर १९९० साली झालेल्या अत्याचारांसंदर्भातील कथानकावर हा चित्रपट आधारित आहे. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करताना दिसत आहे.

आता या चित्रपटाशी संबंधित एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तेलंगाणा येथील एका चित्रपटगृहात स्क्रिनिंगच्यावेळी काही लोकांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. ज्यामुळे चित्रपटगृहात मारहाणीची प्रकारही घडला. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (social media) व्हायरल (viral) होताना दिसत आहे.

तेलंगाणामध्ये (telangana) घडलेली ही घटना १८ मार्चला आदिलाबाद (adilabad) जिल्ह्यात घडली आहे. दोन व्यक्तींनी एका चित्रपटगृहातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी चित्रपटाचं स्क्रिनिंग सुरू असताना भारत विरोधी आणि पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा द्यायला सुरुवात केली. ज्यामुळे चित्रपटगृहातील लोकांनी या व्यक्तींना मारहाण केली.

ही घटना घडल्यानंतर सिनेमागृहातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. मात्र पोलीस येण्याआधीच देशाच्या विरोधाच घोषणा देणाऱ्या त्या व्यक्तींनी चित्रपटगृहातून पळ काढला होता. दरम्यान पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. त्याचं म्हणणं आहे की, ते या घटनेची पुष्टी करत आहेत मात्र अद्याप या घटनेबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार करण्यात आलेली नाही. काही लोकांनी ठरवून असं काही करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान विवेक अग्निहोत्री यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटानं सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटगृहात इतरही बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होऊनही या चित्रपटाचाच बॉक्स ऑफिसवर बोलबाला असलेला पाहायला मिळत आहे. पहिल्याच दिवशी ७०० स्क्रीनवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट नंतर वाढवून २००० स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटात पल्लवी जोशी, अनुपम खेर, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती यांच्या मुख्य भूमिका आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here