४ हजारांची लाच घेताना तलाठ्याला ACB ने रंगेहाथ पकडले

0

टेंभुर्णी,दि.३: ४ हजारांची लाच घेताना तलाठ्याला ACB ने रंगेहाथ पकडले आहे. शेतातील महोगनी झाडांची सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी चार हजारांची लाच घेताना मोडनिंबच्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहाथ पकडले. महेशकुमार मनोहर राऊत ( रा. मेडशिंगी, ता. सांगोला ) असे लाच घेताना पकडण्यात तलाठ्याचे आलेल्या नाव आहे.

यातील तक्रारदार यांची मोडनिंब येथे क्र. ५२२ वर ५८ आर बागायत शेतजमीन आहे. सदर शेतजमिनीपैकी ४० आर शेतजमिनीवर महोगनी झाडाची लागवड केली असून, त्याबाबत सातबारा उताऱ्यावर पिकपाण्याची नोंद घेण्यासाठी मोडनिंबचे तलाठी राऊत यांनी तक्रारदारांकडे चार हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वतः स्वीकारल्याने त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here