सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी वॉटर ऑडिट सुरू

0

सोलापूर,दि.27 : सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी वॉटर ऑडिट करण्याचे काम सध्या सुरू असून, वॉटर ऑडिटच्या माध्यमातून कंजूमर सर्व्हे करण्यासाठी महानगरपालिकेचे मालमत्ता कर विभागातील 100 कर्मचारी यांच्या माध्यमातून प्रत्येकच्या घरोघरी जाऊन पाणी तपासणी अहवाल, मिळकतीची माहिती, मिळकत दाराची माहिती, नळ कनेक्शनची माहिती तसेच पाणी साठवून ठेवण्याची क्षमता इत्यादी बाबतची माहिती घेण्यात येणार असून नागरिकांनी सुद्धा आमच्या महापालिकेच्या सर्व्हेसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना आपल्या नळ कनेक्शन बाबतची संपूर्ण माहिती द्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी केले आहे.

याद्वारे शहराला पुढील 10 ते 15 वर्षासाठी दररोज पाणीपुरवठा कसा करता येईल याचे नियोजन करता येईल. शहरात काही ठिकाणी मिळकतीवर त्यांच्या नळकनेक्शन घेतले आहे. पण त्यांना बिले मिळत नाही. तसेच ज्यांनी नळ कनेक्शन साठी अर्ज केला आहे. त्यांनी आमच्या कर्मचारी यांच्याकडे आपली संपूर्ण माहिती द्यावी जेणेकरून त्यांच्या अर्जाचा विचार करण्यात येईल. हे सर्व्हे दोन महिन्यात पूर्ण करण्यात येणार असून शहरातील नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच महापालिकेचे 100 कर्मचारी घरोघरी जाऊन वॉटर ऑडिट सर्व्हे करून माहिती गोळा करत आहेत. त्यांच्या माध्यमातून ज्या मिळकत करावर चुकीची बिले लागले असेल त्यांनी अर्ज करावे. त्या अर्जाची तपासणी करून दुरुस्ती करण्यात येईल, अशी माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here