पाकिस्तानच्या या विजया नंतर वकार युनूसचे वादग्रस्त वक्तव्य

0

दि.26: टीम पाकिस्तानने टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) पहिल्याच सामन्यात टीम इंडियाला जोरदार धक्का दिला आहे. भारताने दिलेलं 152 रनचं आव्हान पाकिस्तानने 17.5 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता पूर्ण केलं. बाबर आझमने 51 बॉलमध्ये नाबाद 66 रन आणि मोहम्मद रिझवानने 55 बॉलमध्ये नाबाद 79 रन केले.

पाकिस्तानच्या या विजयावर बोलताना त्यांचा माजी फास्ट बॉलर वकार युनूसची (Waqar Younis) जीभ घसरली आहे. या विजयाचा विश्लेषण करताना वकारने धर्म मध्ये आणला. ‘भारत पाकिस्तान मॅचदरम्यान हिंदूंच्या मध्ये मोहम्मद रिझवानने नमाझ पठण केलं. त्याच्या बॅटिंगपेक्षा हे जास्त आनंद देणारं होतं,’ असं वकार युनूस म्हणाला.

View this post on Instagram

A post shared by Shoaib Akhtar (@imshoaibakhtar)

वकार युनूसच्या या वक्तव्यावर लोकप्रिय कॉमेंटेटर हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांनी टीका केली आहे. ‘वकार युनूससारख्या माणसाने असं वक्तव्य केल्यामुळे मी निराश झालो आहे. अशा वक्तव्यांवर न बोलता आम्ही खेळाविषयी बोलतो, पण अशी वक्तव्यं ऐकणं भयानक आहे. पाकिस्तानमधल्या खऱ्या क्रिकेट प्रेमींना या वक्तव्यामधला धोका कळेल आणि तेदेखील निराशा व्यक्त करतील, अशी माझी अपेक्षा आहे. अशा वक्तव्यांमुळे क्रिकेट हा फक्त खेळ आहे आणि ही फक्त क्रिकेट मॅच आहे, असं सांगणं आमच्यासारख्या क्रीडाप्रेमींना कठीण जातं,’ असं हर्षा भोगले त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here