Walmik Karad: वाल्मीक कराडवर मकोका कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

0

बीड,दि.14: वाल्मीक कराडवर (Walmik Karad) मकोका कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशीसंबंधित खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. कोर्टाने आज झालेल्या सुनावणीनंतर खंडणी प्रकरणात वाल्मीकला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने वाल्मीक कराडला जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला होता. 

मात्र एसआयटीने सरपंच हत्येच्या गुन्ह्यातही कराडचा सहभाग असल्याने त्याच्यावर मकोका कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगत त्याचा ताबा मागितला. तसंच मोक्का कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाने एसआयटीला कराडचा ताबा घेण्याची परवानगी दिली आहे. (Walmik Karad News)

याआधी हत्या प्रकरणातील 8 आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. मकोका लावण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुदर्शन घुले, विष्णू चाटे, सुधीर सांगळे, जयराम चाटे, सुधीर घुले, प्रतिक घुले, कृष्णा आंधळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांचा समावेश आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here