सोलापूर,दि.14: माजी महापौर महेश कोठे (Mahesh Kothe) यांचे निधन झाले आहे. सोलापूर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महेश कोठे हे प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेले होते. महेश कोठे यांची अतिशय धक्कादायक एक्झिट मानली जात आहे. (Mahesh Kothe passes away)
मिळालेल्या माहितीनुसार, महेश कोठे हे, त्या नदीमध्ये शाही स्नान करून बाहेर पडले त्यानंतर थंडी मुळे रक्त गोठले आणि त्याच वेळेस त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला. हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
महेश कोठे यांच्या निधनाबद्दल सोलापुरातील विविध राजकीय कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय नेत्यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांचे ते काका होते.
प्रयागराच्या संगमावर असलेल्या कडाक्याच्या थंडीत महेश कोठे भल्या सकाळी नदीत अंघोळ करण्यासाठी गेले होते. नदीमध्ये शाही स्नान करून बाहेर आल्यानंतर थंडीचा त्यांना त्रास जाणवू लागला. त्यातच हृदयविकाराचा झटका आला. उपचारासाठी त्यांना तातडीने रुग्णालयास नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.