Vishnu Gupta: हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांच्यावर गोळीबार

0

अजमेर,दि.25: अजमेर दर्ग्यात मंदिर असल्याचा दावा करणारे हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता (Vishnu Gupta) यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. सकाळी साडेसहा वाजता विष्णू अजमेरहून दिल्लीला जात असताना त्यांच्यावर गोळीबार झाला. गगवाना लाडपुरा कल्व्हर्टजवळ दोन अज्ञात हल्लेखोरांनी हिंदू सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षावर गोळीबार केला. 

मात्र, या हल्ल्यात विष्णू गुप्ता यांनी गोळी लागली नाही आणि ते थोडक्यात बचावले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. 

हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी स्वतः गोळीबाराची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहितीही त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. यापूर्वीही अशा धमक्या आल्या होत्या, असे त्यांनी सांगितले. विष्णू यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत.

विष्णू  गुप्ता यांनी अजमेर दर्ग्यात मंदिर असल्याचा दावा केल्यापासून त्यांना अनेक धमकीचे फोन आले आहेत, ज्याचा पोलीस तपास करत आहेत. यामुळे त्यांनी पोलिसांकडे संरक्षण देण्याची मागणीही केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here