Papad Viral Video: राजस्थानात वाळू बनली चूल, भाजला पापड 

0

सोलापूर,दि.22: Papad Viral Video: देशातील अनेक भागात उष्णतेने कहर केला आहे. पश्चिम राजस्थानमध्ये उष्णतेचा कडाका वाढला आहे. तिथलं तापमान इतकं वाढलंय की वाळू तव्यासारखी तापू लागली आहे. या गरम वाळूत पापडही सहज भाजता येतो. याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बिकानेर जिल्ह्यात असलेल्या भारत-पाकिस्तान सीमाभागातून दाखवल्या जाणाऱ्या या व्हिडिओमध्ये बीएसएफचा एक जवान गरम वाळूमध्ये पापड भाजताना आणि तो तोडताना दिसत आहे.

उष्णतेची लाट

पश्चिम राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यात मंगळवारी तापमान 45 अंशांवर नोंदवण्यात आले. त्यानंतर बुधवारी ते 46 अंशांच्या जवळ पोहोचले. त्याच वेळी, राजस्थानमधील पिलानीमध्ये मंगळवारी तापमान 47.2 वर पोहोचले होते. या काळात येणारी उष्णतेची लाट लोकांना होरपळून काढत आहे. या कडक उन्हाळ्यात हा व्हिडिओ समोर आला आहे. 

काही सेकंदात पापड भाजून निघाले | Papad Viral Video

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सीमेवर तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानाने गरम वाळूमध्ये काही काळ पापड ठेवला आहे. हा पापड अवघ्या 35 सेकंदात वाळूत भाजला. व्हिडिओमध्ये सैनिक आपल्या हाताने पापड तोडतानाही दाखवण्यात आला आहे, जेणेकरून व्हिडिओ पाहणाऱ्याला पापड पूर्ण भाजल्याचे पाहण्यास मिळू शकेल. हा व्हिडीओ पाहून तुम्ही सहज कल्पना करू शकता की वाळवंटातील वाळू किती उष्ण आहे आणि या कठीण परिस्थितीतही आपल्या देशाचे सैनिक सीमेवर पूर्ण सतर्कतेने आपले कर्तव्य बजावत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here