दि.18: viral video: सोशल मीडियावर (social media) अनेक प्रकारचे व्हिडिओ (video) व्हायरल होतात. अनेक व्हिडिओ मजेशीर (funny videos) असतात. प्राण्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. प्राणी सहसा माणसांना त्रास देत नाहीत किंवा माणसांवर हल्ला करत नाहीत. माणसे मात्र अनेकवेळा विनाकारण प्राण्यांना त्रास देतात. ‘आ बैल मुझे मार…’ ही म्हण हिंदीत प्रसिद्ध आहे. ही म्हण नुकतीच खरी ठरवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती असं काही काम करतो की त्यानंतर त्याला जन्माची अद्दल घडते. या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून तो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक बैल कोपऱ्यात शांतपणे उभा आहे. यादरम्यान एक माणूस त्याच्या जवळ जातो. त्याच्या हातात एक काठी असते. त्याने तो बैलाला मारतो. काठी लागताच बैल खवळतो आणि त्या व्यक्तीकडे वळून त्याला चांगलीच अद्दल घडवतो. बैल त्या व्यक्तीला शिंगाने मारतो. या हल्ल्यामुळे तो माणूस अक्षरश: हवेत उडतो आणि धपकन जमिनीवर पडतो.
हा व्हिडीओ पाहिल्यावर लोक म्हणत आहेत की, आ बैल मुझे मार ही म्हण लहानपणीच लोकांनी सांगितली आहे. हा व्हिडिओ नुकताच अधिकारी सुशांत नंदा (IFS) यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. ‘दुष्कर्माचं लगेच वाईट फळ’ (Instant Karma) असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. या व्हिडिओला हजारोंच्या संख्येने लाईक्स मिळाले आहेत. तसेच लोक या व्हिडिओवर आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.