मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांचे छगन भुजबळ यांना प्रत्युत्तर

0

मुंबई,दि.27: मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रत्युत्तर दिलंय. छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला सरकारने आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रतिक्रिया दिली. हा मसुदा आहे, सुचना आहे असे भुजबळ म्हणाले. झुंडशाहीने कायदे बदलता येत नाही. उद्या लाखो लोक घेऊन अजून कोणी आले तर आपण कायदा बदलणार आहोत का? असा सवाल त्यांनी आपल्याच सरकारला केला.

ओबीसीला धक्का लागणार नाही असं म्हणतात आणि मागच्या दारानं एन्ट्री करतात, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली होती. छातीवर हात ठेवून सांगा, खरोखरच संपूर्ण मराठा समाज ओबीसीमध्ये आला आहे का? असा सवाल विनोद पाटील यांनी केलाय.

मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील म्हणाले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सगेसोयरे बाबत काढलेल्या जीआरचं मनापासून स्वागत आहे. आमचे सहकारी मनोज जरांगे पाटील यांचे हार्दिक अभिनंदन! समस्त मराठा समाजाच्या एकीमुळे हा ऐतिहासिक निर्णय झाला..

एवढ्यात बातमी पाहिली की ‘मराठ्यांना ओबीसी मध्ये मागच्या दाराने घुसवलं जात आहे,’ असं भुजबळ साहेबांनी वक्तव्य केलं आणि त्यांना आजचा निर्णय मान्य नाही. त्या विरोधात न्यायालयीन लढाई ते लढणार आहेत. माझा भुजबळ साहेबांना सवाल आहे की, खरोखरच संपूर्ण मराठा समाज ओबीसीत आला आहे का? खरंच ५४ लाख कुणबी नोंदी मिळाल्या का? भुजबळ साहेब आपण जबाबदार मंत्री आहात, तुम्हाला देखील खरी हकीकत माहित आहे. तरी देखील विनाकारण तेढ निर्माण करणारे वक्तव्य आपण करत आहात.

मराठ्यांना ओबीसीत सामील करून घेण्याचा कुठलाही निर्णय झालेलाच नाही. तुमचे सदरील स्टेटमेंट बिनबुडाचे आहे! आपण राज्याचे मंत्री म्हणून जबाबदारीने वक्तव्य केले पाहिजे.

सर्व समाज बांधवांना सांगू इच्छितो, ज्यांच्या नोंदी झालेल्या नाहीत, अशा सर्वांसाठीच शेवटच्या श्वासापर्यंत मी न्यायालयीन लढाई लढणार आहे. क्युरेटीव्ह पिटीशनचा निकाल मराठा समाजाच्या बाजूनेच येईल, हा मला ठाम विश्वास आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या नाही अशा सर्वांसाठी माझी लढाई सुरू राहील. आई जगदंबा माझ्या लढाईला निश्चितपणे यश देईल.

येणारी शिवजयंती आपण मराठा आरक्षणाची शिवजयंती म्हणून साजरी करू, असा शब्द मी तमाम समाज बांधवांना देतो!

विनोद पाटिल


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here