Vinayak Raut On Kiran Samant: किरण सामंत यांचे व्हॅाटसॲप स्टेटस, खासदार विनायक राऊत यांचे सूचक विधान

0
विनायक राऊत आणि किरण सामंत

मुंबई,दि.३०: Vinayak Raut On Kiran Samant: किरण सामंत यांचे व्हॅाटसॲप स्टेटस, खासदार विनायक राऊत यांनी सूचक विधान केले आहे. मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवरील डीपीमुळं राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत असलेल्या किरण सामंत यांनी डीपीवर ठाकरे गटाचं ‘मशाल’ चिन्ह ठेवलं. तसेच, कॅप्शनला ‘जो भी होगा देखा जागेया’ असं लिहिण्यात आलं होतं. यानंतर राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. तर, आता शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार विनायक राऊत यांनी सूचक विधान केलं आहे.

Vinayak Raut On Kiran Samant: खासदार विनायक राऊत यांचे सूचक विधान

विनायक राऊत म्हणाले, “किरण सामंत यांच्यासारखे शिंदे गटातील अनेकजण मशाल चिन्ह हाती घेऊन उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करण्याच्या मानसिकतेत आहेत. येत्या काही महिन्यात शिंदे गटाला रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्रात मोठं भगदाड पडणार आहे. भाजपा शिंदे गटाचं लवकरच विसर्जन करेल, हे माहिती असल्यानं अनेकांच्या हातात मशाल येईल.”

किरण सामंत काय म्हणाले?

व्हॉट्सअ‍ॅप डीपी प्रकरणावर किरण सामंत यांनी म्हटलं, “मी डीपी ठेवला होता. याला काही कारणं होती. त्यावर योग्यवेळी बोलेन. फक्त एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांकडे पाहून डीपी मागे घेतला.”

‘जो भी होगा देखा जाये गा’ असं कॅप्शन लिहिण्याबाबत किरण सामंत म्हणाले, “शंभर टक्के सर्व गोष्टीला आपली तयारी होती. फक्त उदय सामंत यांच्या राजकीय करिअरमुळे कॅप्शन मागे घेतलं. माझ्यामुळे उदय सामंत यांचं राजकीय करिअर खराब होऊ नये.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here