शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर अन् भाजपा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची

शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर अन् भाजपा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यात पीक विम्यावरून हमरीतुमरी

0

उस्मानाबाद,दि.3: शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर अन् भाजपा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यामध्ये हमरीतुमरी झाली आहे. ठाकरे गट शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर (MP Omraje Nimbalkar) आणि भाजपचे आमदार राणाजगजितसिंह (MLA Ranajagjitsinha Patil) यांच्यात बाचाबाची झाल्याचं समोर आलं आहे. शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या मुद्द्यावरुन दोघांमध्ये खडाजंगी झाली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर अन् आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यामध्ये उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शाब्दिक बाचाबाची झाली. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांसमोर देखील या दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याची माहिती मिळाली आहे.

ओमराजे निंबाळकर हे राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर संतापले

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत बैठकीत काहीतरी संवाद सुरु असताना राणाजगजीतसिंह पाटील यांनी ओमराजेंना ‘बाळ’ असं संबोधलं. यावर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्यांना ‘मला बाळ म्हणू नको, तू तूझ्या औकातीत राहा, तुमचे संस्कार, तुमची औकात मला सगळं माहित आहे, जास्त बोलू नकोस, तुला मी बोललेलो नाही, तुझं बोलायचं कारण नाही’, असं म्हटलं. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली अन् या वादावर पडदा पडला.

शेतकरी पीक विम्याच्या विषयावरुन आक्रमक

पीक विम्याच्या मुद्द्यावरुन उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील हे जिल्हाधिकारी यांच्यासोबत पीक विमा प्रश्नी बैठक घेत असताना बाहेर गोंधळ सुरु झाला, आमदारांसोबत बैठक घेऊ नका, शेतकऱ्यांसोबत बैठक घ्या, यासाठी शेतकरी आक्रमक झाले होते.

शेतकरीऱ्यांसोबत पीक विमा प्रतिनिधी यांची बैठक घेण्यासाठी शेतकरी आग्रही आहे. फक्त आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या सोबत जिल्हाधिकारी बैठक घेत असल्याने शेतकरी संतप्त झाले होते. शेतकऱ्यांना 2022 चा पीक विमा द्यावा यासाठी शेतकरी आक्रमक झाले होते. ॲग्रिकल्चर पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना कमी विमा दिल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.

याचदरम्यान खासदार ओमराजे निंबाळकर अन् आमदार राणाजगजीतसिंह पाटलांमध्ये हमरीतुमरी सुरु झाली. पिक विमा हा प्रश्न शेतकऱ्यांशी निगडित असल्याने शेतकऱ्यांना या बैठकीत समाविष्ट करावे करावे अशी मागणी करत काही शेतकरी करत होते. हा शेतकऱ्याचा प्रश्न असताना शेतकऱ्यांना कलेक्टर केबिनच्या बाहेर उभा केल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातच गोंधळ घातला. शेतकऱ्यांची मागणी आहे की, पिक विमा वेळेत मिळावा, प्रीमियम भरून देखील शेतकऱ्यांना पिक विमा मिळालेला नसल्याने शेतकरी गोंधळ करत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here