सोलापूर, दि.2: जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त वीरशैव व्हीजन उत्सव समिती अध्यक्षपदी चिदानंद मुस्तारे यांची तर सोमनाथ चौधरी यांची सचिवपदी निवड करण्यात आली आहे.
वीरशैव व्हिजन उत्सव समिती
भुसार गल्ली येथील श्री मन्मथेश्वर मंदिर येथे रविवारी सकाळी वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नूतन उत्सव समिती गठीत करण्यात आली.
2023-24 या वर्षांतील उत्सव समिती पुढीलप्रमाणे अध्यक्ष चिदानंद मुस्तारे, उपाध्यक्ष अविनाश हत्तरकी, सचिव सोमनाथ चौधरी, सहसचिव बसवराज जमखंडी, कार्याध्यक्ष सचिन विभूते, कोषाध्यक्ष गौरीशंकर अतनुरे, कार्यक्रम प्रमुख बसवराज चाकाई, स्पर्धाप्रमुख धानेश सावळगी, प्रसिद्धिप्रमुख शिव कलशेट्टी, व्याख्यानमाला प्रमुख प्रा. मलकप्पा बणजगोळे, उपप्रमुख राहुल बिराजदार, सोशल मीडिया प्रमुख अमोल कोटगोंडे, सोशल मीडिया सहप्रमुख चेतन लिगाडे, पूजा समिती मेघराज स्वामी, बद्रिनाथ कोडगे-स्वामी, संगमेश्वर स्वामी, संयोजन समिती अमित कलशेट्टी, गंगाधर झुरळे, केतन अंबुलगे.
या बैठकीस आनंद दुलंगे, संजय साखरे, नागेश बडदाळ, शिवानंद सावळगी, राजेश नीला, मनोज पाटील, संगमेश कंठी, गौरीशंकर अतनुरे, सिद्धेश्वर कोरे, अमित कलशेट्टी सोमशेखर याबाजी, विजयकुमार बिराजदार, सिद्राम बिराजदार, नागेश गदगे, आनंद नसली, प्रा. मल्लिकार्जुन पाटील, मेघराज स्वामी, महेश विभुते, युवक अध्यक्ष विजयकुमार हेले, प्रसाद गोटे आदी उपस्थित होते.
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही बसव सप्ताहांतर्गत बसव व्याख्यानमाला व इतर समाजोपयोगी उपक्रम घेणार आहोत. तसेच वीरशैव व्हिजनच्या धोरणानुसार येत्या वर्षभरातही सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आरोग्य, पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रातील उपक्रम राबविणार आहोत.
चिदानंद मुस्तारे
नूतन अध्यक्ष
वीरशैव व्हिजन उत्सव समिती