सोलापूर,दि.2: Uttamprakash khandare: माजी मंत्री व सोलापूर उत्तर राखीव मतदारसंघातून सलग तीन टर्म आमदार राहिलेल्या व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते उत्तमप्रकाश खंदारे यांना लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार,अनैसर्गिक संभोग व फसवणूक केल्याप्रकरणी दाखल खटल्यामध्ये अटकपूर्व जामिनावर मुक्तता करणेचा आदेश पुणे येथील सत्र न्यायाधीश सोनाली राठोड यांनी पारित केला.
माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांच्यावर बलात्काराचा आरोप | Uttamprakash khandare
यात हकीकत अशी कि, सन 2012 साली पिडितेची उत्तमप्रकाश खंदारे यांचेबरोबर ओळख झाली. त्यावेळी त्यांनी पीडितेला लग्नाची मागणी घातली परंतु तिने त्यास नकार दिला. त्यानंतर ते तिला फिरायला आय बी रेस्ट हाऊस पुणे येथे घेऊन गेले व त्यांनी तिच्याशी जबरदस्तीने तिच्या मनाविरुद्ध शरीरसंबंध केले. अश्लील व्हिडीओ दाखवून चाकूचा धाक दाखवून अनैसर्गिक संभोग केला. त्यांच्यात वाद झाल्यानंतर तिला विवस्त्र करून पट्ट्याने मारहाण केली व तिला पुण्यातील रेल्वे पुलावरून ढकलून दिल्याने तिचा पाय आणि मणका फ्रॅक्चर झाला.
त्यानंतर ते दीड वर्षांनी पुन्हा भेटले. त्यातून त्यांना मुलगा झाला त्याचे नाव सूर्यतेज ठेवले.तिने सन 2018 साली खंदारेविरुद्ध पोलिसात तक्रार दिली असता ती मिटवून खर्चापोटी तिला व मुलाला दिलेले रक्कम रु 3 लाख व 5 लाखाचे चेक न वाटल्याने फसवणूक झाली, अशा आशयाची फिर्याद पीडितेने बिबवेवाडी पोलीस स्टेशनला दाखल केलेली होती. यात अटक होण्याचे भीतीने उत्तमप्रकाश खंदारे यांनी ॲड. संतोष न्हावकर यांचेमार्फत अटकपूर्व जामिनासाठी पुणे येथील सत्र न्यायालयात धाव घेतली होती.
यात युक्तिवाद करताना ॲड. संतोष न्हावकर यांनी प्रस्तुत फिर्याद दाखल करण्यापूर्वी पीडितेने 2018, 2020 व 2022 अशा तीन वेळा बलात्काराच्या तक्रारी खंदारेविरुद्ध दाखल केलेल्या होत्या, त्यामध्ये पोलिसांनी वेळोवेळी चौकशी केलेली होती, प्रत्येकवेळी केलेली तक्रार हि महिन्याकाठी खंदारे कडून रक्कम मिळणे थांबल्याने करण्यात आलेली होती, यात पोलिसांनी खंदारे यांची तीन वेळा चौकशी केलेली आहे,सहमतीने एकत्र राहून नंतर एकमेकांशी पटले नाहीतर त्यास लग्नाचे आमिष दाखवून केलेला बलात्कार म्हणता येत नाही असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले व त्यापृष्ठयर्थ सर्वोच्च न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाचे निवाडे दाखल केले.
तो युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायमूर्तींनी उत्तमप्रकाश खंदारे यांची रक्कम रु 25000/-चा जातमुचलका व जामीन देण्याचे व तपासकामी पोलिसांनी सहकार्य करण्याचे अटीवर अटकपूर्व जामिनावर मुक्त करणेचे आदेश पोलिसांना दिले.
यात उत्तमप्रकाश खंदारे यांच्यातर्फे ॲड. संतोष न्हावकर, ॲड. शैलेश पोटफोडे, ॲड. सुधीर पाटील (पुणे ) ॲड. कार्तिक पाटील यांनी तर सरकारतर्फे ॲड. रासकर यांनी काम पहिले.