नवी दिल्ली,दि.12: केंद्रीय मंत्रिमंडळाने वन नेशन वन इलेक्शन विधेयकाला मंजुरी दिल्याची माहिती समोर येत आहे. भाजपाने गेल्या अनेक दिवसांपासून वन नेशन वन इलेक्शन विधेयक आणण्याची तयारी केली होती. विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध केला होता. काही दिवसांपूर्वीच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील समितीने एक देश एक निवडणुकीबाबतचा अहवाल तयार केला होता. हे विधेयक येत्या आठवड्यात संसदेत मांडण्यात येणार असल्याचे समजते.
एएनआय या वृत्तसंस्थेने त्यांच्या सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. लोकसभा तसेच राज्यसभेत चर्चा होऊन मंजुरी मिळाल्यानंतर या विधेयकाला कायदेशीर मान्यता मिळणार आहे. त्यामुळे आता लवकरच हे विधेयक लागू केले जाण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यामध्ये हे महत्वाचे विधेयक संसदीय कामकाजाच्या पटलावर मांडले जाईल. परंतु आधीपासूनच विरोध करत असलेली इंडिया आघाडी काय भूमिका घेणार? यावर त्याची अंमलबजावणी ठरवली जाणार आहे.








