सोलापूरजवळ उड्डाणपुलावरून कोसळून 12 काळविट व हरणांचा दुर्दैवी मृत्यू

0

सोलापूर,दि.28: सोलापूर – पुणे राष्ट्रीय महामार्गावरील नव्याने तयार करण्यात आलेल्या विजापूर बायपास उड्डाणपुलावरून पडल्याने 12 काळविट व हरणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास केगाव गावाजवळ घडली. दोन काळवीट गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेला वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांनी दुजोरा दिला आहे.

या भागात हरणांसह काळविटांचा वावर असतो

केगाव-विजापूर राष्ट्रीय महामार्ग बाह्यवळणावर देशमुख वस्तीनजीक उड्डाणपूल आहे. या भागात हरणांसह काळविट व इतर वन्य प्राण्यांच्या कळपांचा नेहमीच वावर असतो. आसपासचा बहुतांशी परिसर सपाट आणि तुलनेत कमी वर्दळीचा आहे. हरीण व काळविटांचे कळप राष्ट्रीय महामार्गावर येतात आणि रस्ता ओलांडून पुढे जातात.

रस्त्यावरील वाहनांमुळे भीतीने पुढे पळत असताना अपघात होतात. उड्डाणपुलावरून पुढे पळताना काळविटांचा कळप उड्डाणपुलावरून खाली कोसळतो आणि त्यांचे जीव जातात. असे प्रकार नेहमीच घडतात, असे केगाव परिसरातील ग्रामस्थांनी सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here