Undergraduate Exam: परीक्षा देण्यासाठी लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक, या महाविद्यालयाने काढली नोटीस

0

लखनऊ,दि.30: Undergraduate Exam: लखनौच्या नॅशनल पीजी कॉलेजमध्ये (National PG College) परीक्षेला बसण्यासाठी लसीकरण प्रमाणपत्र सोबत आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता कॉलेज प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

कॉलेजमध्ये 5 जानेवारीपासून पदवीच्या पहिल्या आणि तिसऱ्या सत्राच्या परीक्षा सुरू होत आहेत, त्यामुळे कॉलेज प्रशासनाने हा आदेश जारी केला आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला प्रमाणपत्राशिवाय परीक्षेला बसता येणार नाही, असे कॉलेज प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे लसीकरणाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

कॉलेजने जारी केलेल्या माहितीनुसार, कॉलेजमध्ये जानेवारी-फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या सेमिस्टर परीक्षेत बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेशासोबत कोविड-19 लसीकरणाचे (Covid Vaccination Certificate) एक किंवा दोन्ही लस घेतल्याचे प्रमाणपत्र आणावे लागेल. परीक्षेला बसण्यासाठी लसीकरणाचे प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे. या प्रमाणपत्रांशिवाय परीक्षेला बसणे शक्य होणार नाही.

महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रोफेसर देवेंद्र सिंह यांच्या म्हणण्यानुसार, कोविडचे वाढते प्रकरण लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सेमिस्टर परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस किंवा एक डोस प्रमाणपत्र असणे बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रमाणपत्राशिवाय विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here