लायन्स क्लब इंटरनॅशनल अंतर्गत सोलापूर सिटी अर्चना ऑक्टोबर सेवा सप्ताहाचे समारोप

0

सोलापूर,दि11: लायन्स क्लब इंटरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटी सोलापूर वतीने अर्चना ऑक्टोबर सेवा सप्ताह समारोप आणि झोन चेअरमन यांची क्लबला अधिकृत भेट, तसेच विविध पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर ला मोहन भूमकर, अध्यक्ष लायन आनंद पुनमिया झोन चेअरमन, माजी आमदार दिलीपराव माने, सुधीर खरटमल, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, लायन डॉ माधुरी अवसेकर, सेवा सप्ताह प्रमुख, लायन चंदन चव्हाण खजिनदार यांची उपस्थिती होती.

सुरूवातीला लायन मोहन भूमकर अध्यक्ष यांनी घंटानाद करून सभेची सुरुवात करण्यात आली. ध्वजवंदन लायन पद्माकर शिंदे यांनी केले. लायन मोहन भूमकर अध्यक्ष यांनी सर्व सन्माननीय मान्यवराचे स्वागत करून सत्कार केला. यावेळी माजी आमदार दिलीप माने, सामाजिक कार्यकर्ते सुधीर खरटमल, झोन-2 सचिव लायन सोमशेखर भोगडे यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.

पुरस्काराचे मानकरी सुजाता जुगदार, सांतलिंग शटगार, आदर्श शिक्षक पुरस्कार, इंजिनीयर पुरस्कार आरती चव्हाण,कोव्हिड योद्धा म्हणून बालाजी शालिमार, चन्न्नबरड माळगे, मनोज घनाते, राजु तोळनूर, विठ्ठल कलबुगीं, प्रभात मंडळ विजापूर रोड सोलापूर याना प्रमाणपत्र, स्मृती चिन्ह, शाल, मोत्यांचा माळ, बुके देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी सुधीर खरटमल आणि दिलीप माने यांनी क्लबचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

तसेच झोन चेअरमन लायन आनंद पुनमिया यांनी मार्गदर्शन केले व कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ला नंदकुमार शिंदे, लायन राजन शहा आभार प्रदर्शन डॉ. माधुरी अवसेकर यांनी केले. तर सुत्रसंचलन संध्या श्रुंगारपुरे यांनी केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here